HW News Marathi
महाराष्ट्र

नांदेडमध्ये भाजपला मोठं खिंडार! प्रदेश उपाध्यक्षाचा राजीनामा, लवकरच काँग्रेस प्रवेशाची शक्यता

नांदेड | भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी पक्षासोबतचा सात वर्षांचा प्रवास संपवत आपल्या स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आहे. भास्करराव पाटील खतगावकर यांनी भाजपचा राजीनामा देऊन लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा आज (१७ ऑक्टोबर) केली आहे. खतगावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप सोडण्याचं आपलं कारणही स्पष्ट केलं आहे. “भाजपमध्ये माझी घुसमट होत असून खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून मी लवकरच माझ्या कार्यकर्त्यांसह पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे”, असं भास्करराव पाटील खतगावकर यांनी यावेळी सांगितलं आहे.

भास्करराव पाटील खतगावकर यांच्यासह माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्यासह भाजपतील अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भास्करराव पाटील खतगावकर हे नांदेड जिल्ह्यातील मातब्बर नेते म्हणून ओळखले जातात. ते तीन वेळा आमदार, तीन वेळा खासदार व राज्याचे मंत्री देखील राहिले आहेत.

देगलूर बिलोली पोटनिवडणुकीपूर्वी भाजपला दणका

भास्करराव पाटील खतगावकर यांच्या या निर्णयाने देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीपूर्वी भाजपतील दुफळी उघड झाली आहे. देगलूर बिलोली विधानसभेची पोटनिवडणूक महत्त्वाची समजली जात आहे. विद्यमान दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर येत्या ३० ऑक्टोबरला मतदान घेण्यात येणार आहे. पुनर्रचनेनंतर २००९ साली अस्तित्वात आलेला देगलूर- बिलोली विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी म्हणून राखीव झाला आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

….जर ही वेळ आलीच तर मग सरकार राहणार नाही!

News Desk

भारतीय नौदलातील साताऱ्याच्या सुपुत्राचं धाडसी कर्तुत्व, 186 मच्छिमारांना वाचवलं, नौदल प्रमुखांनी घेतली दखल

News Desk

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना तत्काळ मदत द्या; दत्तात्रय भरणेंच्या सूचना

Aprna