HW News Marathi
महाराष्ट्र

धक्कदायक ! मुंबईतील तब्बल ४४३ इमारती अतिधोकादायक स्थितीत

मुंबई | मुंबईतील फोर्ट परिसरातील ६ मजली इमारती कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर आज (२० जुलै) मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शहरातील धोकादायक इमारतींचा आढावा घेतला. पालिका, आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मात्र एक धक्कादायक खुलासा झाला आहे. मुंबईत सद्यस्थितीत महापालिका, म्हाडा, सरकारी आस्थापने यांच्या मिळून एकूण तब्बल ४४३ इमारती अतिधोकादायक स्थितीत असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. पुढच्या आठवड्यात याच मुद्द्यावर पालिकेची आणखी एक बैठक होणार आहे.

“सद्यस्थिती मुंबईत महानगरपालिकेच्या ५६, सरकारी २७, खासगी ३६० अशा मिळून एकूण ४४३ इमारती अतिधोकादायक स्थितीत आहेत. शहरातील या सर्व अतिधोकादायक इमारतींचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. या इमारती कोणाच्याही असल्या तरीही आता याबाबत तातडीने ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. लोकांचा जीव सर्वात महत्त्वाचा आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे. त्यामुळे, कोणीही आपली जबाबदारी झटकून चालणार नाही”, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर आता पालिकेकडून नेमके कोणते पाऊल उचलले जाणार ? हे पाहणे आवश्यक आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पावसामुळे मुख्यमंत्र्यांचा सातारा दौरा रद्द, ठाकरे ही म्हणाले, मी पुन्हा येईन….

News Desk

…आणखी संपन्न, समृद्ध महाराष्ट्रासाठी एकजूट होऊया! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

वाढीव वीज बिलासंदर्भात बातचीत करण्यासाठी अदानी CEO कृष्णकुंजवर

News Desk