HW News Marathi
Covid-19

धक्कादायक ! बीडमध्ये कोरोना योद्ध्याला मिळाली नाही ॲम्बुलन्स, पॉझिटिव्ह असताना रात्रभर ड्युटी

बीड । कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांलाच ॲम्ब्युलन्स मिळाली नाही म्हणून पॉझिटिव्ह असताना रात्रभर चेकपोस्टवर ड्युटी करावी लागल्याचा धक्कादायक प्रकार बीड जिल्हयातील परळी येथे उघडकीस आला. या प्रकाराने आरोग्य यंत्रणेचा हलगर्जीपणा उघडकीस आला आहे. कोरोना व्हायरसचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णवाहिका न आल्याने सकाळपर्यंत चेकपोस्टवर ड्यूटी करून स्वतः दुचाकीवर रूग्णालयात दाखल झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात संशयित म्हणून स्वॅब देऊनही ड्युटी कशी लावली ? पाॅझिटिव्ह आल्यावर ॲम्ब्युलन्स देखील वेळेवर मिळाली नाही ? यामुळे आरोग्य यंत्रणेचा निष्काळजीपणा समोर येत आहे. या संदर्भात जिल्ह्यातून संताप व्यक्त केला जात आहे. जिल्हयातील वाढता आकडा त्यात या प्रकारामुळे कोरोना संदर्भात प्रशासनाला गांभीर्य आहे का ?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

परळी शहर ठाण्यातील ४२ वर्षीय पोलीस कर्मचारी हा बीड-लातूर सीमेवरील जोडवाडी चेकपोस्टवर कर्तव्यास होता. शुक्रवारी (२४ जुलै) त्यांचा ‌‌स्वॅब‌ घेण्यात आला होता. त्यानंतरही त्यास शनिवारी (२५ जुलै) ड्युटी देण्यात आली. शनिवारी दिवसभर या कर्मचाऱ्याने अन्य दोन सहकारी आणि एका पोलीस अधिकाऱ्यासोबत जोडवाडी चेकपोस्टवर ड्युटी केली. रात्री उशिरा त्यांना अहवाल पाॅझिटीव्ह आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांना तातडीने कोविड कक्षात दाखल करणे गरजेचे होते. मात्र, त्यांना रुग्णवाहिका मिळाली नाही. पाॅझिटीव्ह असतानाही रात्रभर त्या कर्मचाऱ्याने इतरांना लागण होणार नाही याची काळजी घेत कर्तव्य बजावले. सकाळी ८ वाजता सुटी झाल्यानंतर तो कर्मचारी स्वतः गाडी चालवत रुग्णालयात दाखल झाला. या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या पोलिसांचे आज (२७ जुलै) स्वॅब‌ घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

परळीचा कर्मचारी कोरोनाबाधित असल्याची माहिती रात्री उशीरा कळली ॲम्ब्युलन्स मिळाली नाही. त्या संबधित कर्मचाऱ्यांने स्वाब दिल्याचे इतरांना माहित नव्हते. तसेच कोणतेही लक्षण आढळून न आल्याने स्वतः दिवसभर ड्युटीवर होता. सकाळी माझी गाडी कोण घेऊन येईल म्हणून स्वतः गाडी चालवत तो हॉस्पिटलमध्ये गेला. या प्रकरणात कोणताही हलगर्जी पणा झाला नाही.अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी दिली.या प्रकारानंतर परळीतील जनतेत संताप व्यक्त केला जात आहे, तालुक्यात कोरोना पॉझिटिव्हचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून याचे गांभीर्य न ठेवता त्याबरोबरच हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर वर कारवाईची मागणी होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात दररोज वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात मोठी घट

News Desk

महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील !

News Desk

इंदापूरमध्ये सोलापूर वरून आलेला नागरिक कोरोना पॉझिटिव्ह….

News Desk