HW News Marathi
Covid-19

धक्कादायक ! बुलढाण्यात संग्रामपूरमध्ये ४७ जणांची ‘क्वारंटाईन पंगत’

बुलढाणा | बुलढाणा जिल्ह्यात संग्रामपूर येथे गुरुवारी (११ जून) पार पडलेल्या एका लग्न समारंभात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या लग्न समारंभात कोरोना पॉझिटिव्ह एका आलेल्या व्यक्तीचा भाऊ नुसता हजरचा नव्हता तर त्याने पंगतीत जेवणही वाढले. त्यामुळे त्या पंगतीतील ४७ जणांना आरोग्य विभागाने होम क्वारंनटाईन केले आहे. या व्यक्तीमुळे उपस्थित नगराध्यक्षांसह अनेक प्रतिष्ठितांच्या हातांवर होम क्वारंटाईनचा शिक्का बसला आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे,आज (१३ जून) संग्रामपुर येथील हायरिक्स कॉन्टॅक्टमधील ११ रिपोर्ट निगेटिव्ह आले. विशेष म्हणजे या निगेटिव्ह आलेल्यांमध्ये पंगतीत वाढणाऱ्या व्यक्तीचाही समावेश असल्याने आता कोरोनाची पंगत वाढण्याची शक्यता मावळली आहे.

बुलढाण्यात जिल्ह्यात ३५ अहवालांपैकी ३ पॉझिटिव्ह

बुलढाणा जिल्ह्यात कोरोना तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविलेल्या अहवालांपैकी 35 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ३२ अहवाल कोरोना निगेटिव्ह तर ३ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर अजून ३८ अहवाल यायचे बाकी आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवाल हे ता. लोणार येथील २५ वर्षीय तरुणी, भुमराळा ता. लोणार येथील 40 वर्षीय महिला आणि जानुना ता. खामगाव येथील 34 वर्षीय पुरुष रूग्णाचे आहेत.

आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल १,७११ आहेत, अशी माहिती निवासी उप जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.जिल्ह्यात एकूण ११३ कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी ४ मृत आहेत. आतापर्यंत ७७ कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या ७७ आहे. सध्या रूग्णालयात ३२ कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात कोरोनाचा आकडा २१५, तिसऱ्या स्टेजमध्ये जाण्याचं सरकारसमोर संकट !

Arati More

उद्धवजी मुख्यमंत्री होऊ नयेत, म्हणून देव पाण्यात ठेवून बसलेल्या काही लोकांबद्दल सहानुभूती !

News Desk

रामदेव बाबा यांच्या पतंजलीचे औषध कोरोनावर किती प्रभावी ?, जाणून घ्या… डॉ. अविनाश भोंडवे काय म्हणतात

News Desk