HW News Marathi
महाराष्ट्र

…तर माझाही ‘धनंजय मुंडे’ झाला असता ! भाजप नेत्यानंतर मनसे नेत्यांचीही धक्कादायक माहिती

मुंबई | रेणू शर्मा यांनी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या बलात्काराच्या आरोपानंतर आता भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी समोर येत रेणू शर्मा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. यावेळी आंबोली पोलीस स्थानकात कृष्णा हेगडे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर आता मनसे नेते मनीष धुरी यांना देखील रेणू शर्मा यांनी आपल्याला त्रास दिल्याचा खुलासा केला. याबाबत बोलताना “माझाही धनंजय मुंडे झाला असता”, अशी प्रतिक्रिया मनीष धुरी यांनी RNO ला दिली आहे. थोड्याच वेळापूर्वी भाजप नेते कृष्णा हेगडे यांनीसुद्धा रेणू शर्मा यांच्याविरोधात केलेल्या खुलाशानंतर आता मनसे नेत्याकडून हा दावा करण्यात आला आहे.

काय म्हणाले कृष्णा हेगडे ?

भाजपचे नेते आणि माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी मुंबई पोलिसांना यासंदर्भात सविस्तर पत्र लिहून माहिती दिली आहे. रेणू शर्माने मलाही रिलेशनमध्ये येण्यासाठी दबाव आणला होता असे कृष्णा हेगडे यांनी या पत्रात लिहिले आहे.

या पत्रात कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मा यांनी मलाही रिलेशनशिपच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. २०१० पासून रेणू शर्मा मला सतत कॉल आणि मेसेज करत होती. त्या सातत्याने मला रिलेशनशिपसाठी गळ घालत होत्या.मी नकार देऊनही रेणू शर्मा यांनी २०१५ पर्यंत मला त्रास देणे सुरुच ठेवले. त्यांनी माझ्यावर पाळतही ठेवली होती. रेणू शर्मा या मला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रयत्नात होत्या. मात्र, मी त्यांना भेटणे टाळले.

मात्र, मी बाहेरून केलेल्या चौकशीत रेणू शर्मा यांनी अशाप्रकारे इतर व्यक्तींना फसवल्याची माहिती मला समजली. मुंबई पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी करावी, असे कृष्णा हेगडे यांनी पत्रात म्हटले आहे. विशेष म्हणजे कृष्णा हेगडे यांनी या पत्रामध्ये रेणू शर्मा ज्या फोन नंबरवरुन संपर्क साधायच्या ते क्रमांकही दिले आहेत. आता कृष्णा हेगडे थोड्यावेळात अंबोली पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करणार आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

CBIचे पथक मुंबईत ७ दिवसांपेक्षा कमी कालावधीसाठी आले तर क्वारंटाईन केले जाणार नाही – आयुक्त

News Desk

फडणवीस संभाजीराजेंना म्हणाले,”मराठा आरक्षणासाठी मी कोणासोबतही बसायला तयार पण…”

News Desk

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादींच्या याचिकेवर आज होणार सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

News Desk