HW News Marathi
महाराष्ट्र

शिवनेरी गडावर भाजप विरोधात घोषणाबाजी

पुणे | स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या शिवाजी महाराजांच्या जन्म ठिकाणी शिवनेरी किल्यावर शिवजन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यावेळी हजेरी लावली होती.

या कार्यक्रमासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवप्रेमी शिवनेरी गडावर गर्दी करतात. सुरक्षेचे कारण सांगून पोलिसांनी शिवनेरी गडाच्या पायथ्याशी हजारो संख्येने उपस्थित असणाऱ्या शिवप्रेमींना अडवून ठेवले होते. गडावर न जाता आल्यामुळे नाराज आणि संतप्त लोकांनी भाजपा विरोधात घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली.

शिवजन्मोत्सव सोहळा पार पडल्यानंतर विनोद तावडे आणि पंकजा मुंडे परत जात असताना. लोकांनी त्यांना अडवून जाब विचारण्याचा प्रयत्न केला. ‘मुख्यमंत्री हाय हाय’ अशा भाजपा विरोधी घोषणा देण्यास सुरुवात केली.कडक पोलिस बंदोबस्तमध्ये मंत्र्यांना कार्यक्रम स्थळावरुन बाहेर काढण्यात आले.

Related posts

महापौरांची गाडी ‘नो पार्किंग’ झोनमध्ये, दंडात्मक कारवाई ?

News Desk

“उदय सामंतांना माहितेय भाजपचं सरकार येणार म्हणून फडणवीसांकडे…”, निलेश राणेंनी पुन्हा फटकारलं

News Desk

महाविकासआघाडी किंवा राज्यपालांकडून विधानपरिषदेच्या जागेसाठी माझा विचार करावा | सुरेखा पुणेकर

News Desk