HW News Marathi
महाराष्ट्र

गदिमा यांचे सुपूत्र श्रीधर माडगूळकर यांचे निधन

पुणे | महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी गदिमा यांचे सुपूत्र आणि गदिमा साहित्य कला अकादमीचे विश्वस्त श्रीधर माडगूळकर यांचे आज (२१ फेब्रुवारी) निधन झाले आहे. श्रीधर यांचे दीर्घ आजाराने वयाच्या ७२ वर्षी निधन झाले आहे. यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. बुधवारी (२० फेब्रुवारी) खासगी रुग्णालयात त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यानंतर आज दुपारी १ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

श्रीधर माडगूळकर यांचा जन्म ६ फेब्रुवारी १९४७ रोजी त्यांचा जन्म झाला. श्रीधर यांचे प्राथमिक शिक्षण मॉडर्न हायस्कूल येथे तर महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालय येथे झाले. श्रीधर माडगूळकर यांनी १९७० साली ‘जिप्सी’ या खास तरुणांसाठी असलेल्या मासिकाचे संपादन करुन अनेक नवीन लेखकांना पुढे येण्यास त्यांनी संधी दिली आहे. तसेच ‘धरती’ व साप्ताहिक ‘मायभूमी’ या नियतकालिकांचे उपसंपादक म्हणून काम केले आहे. श्रीधर माडगूळकर यांची ‘आठी आठी चौसष्ट’ ही कादंबरी राजकीय क्षेत्रात मैलाचा दगड समजली जाते. गदिमांच्या आठवणींवरील ‘मंतरलेल्या आठवणी’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे. श्रीधर यांनी अनेक वृत्तपत्रांमधून देखील लेखन केले होते. गोवा येथे भरलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या आठव्या शेकोटी साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्ष पद भूषविले होते.

श्रीधर माडगूळकर यांनी गदिमांची गाणी व आठवणी, थोरली पाती-धाकटी पाती यासारख्या साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन केले. दूरदर्शन तसेच आकाशवाणीवरील अनेक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा. १९९७ साली इंटरनेटवर मराठी भाषेतील ‘जाळं’ या पहिल्या साप्ताहिकाची सुरुवात करून याचे यशस्वी संपादनही त्यांनी केले. त्यांनी सांगली जिल्हातील माडगूळे या खेडयात गजानन विकास प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना करुन कै.ग.दि.माडगूळकर हायस्कूल सुरू केले. त्यांनी महाविद्यालयीन जीवनापासूनच विद्यार्थ्यांच्या विविध चळवळीत सहभाग घेतला. १९७८ साली पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्षपदी व शहर काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड झाली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इतरांना दोष देण्याआधी आपल्या घरातील गोष्टी निस्तरा…नितेश राणेंचा वार 

News Desk

मेट्रो-३ च्या प्रकल्पावरुन पुन्हा एकदा फडणवीसांकडून सरकारची कानउघाडणी

News Desk

“आपली सर्वोच्च न्यायसंस्था खरंच स्वायत्त आहे काय?” – सामना

News Desk