HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेना-भाजपमधील तिढा सुटेपर्यंत ‘मला मुख्यमंत्री करा’, शेतकरी पुत्राचे राज्यपालांना पत्र

बीड | विधानसभा निवडणुकीचा निकाल लागूनही राज्यात सरकार स्थापन झाले नाही. शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटेपर्यंत मला मुख्यमंत्री पदाचा पदभार देण्यात यावा, असे पत्र एका शेतकऱ्याच्या मुलांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी लिहिले आहे. या पत्रकारमुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील दहिफळ गावातल्या श्रीकांत विष्णू गदळे यांनी ही मागणी केली आहे. गदळे यांच्या पत्रकारची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

“महाराष्ट्रातल्या शिवसेना-भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटेपर्यंत मला मुख्यमंत्री पदाचा पदभार देण्यात यावा, अशा आशयाचे पत्र लिहून त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. गदळेंनी पत्रात पुढे लिहिले की, मला मुख्यमंत्री पदाभार दिल्यानंतर मी शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तात्काळ तात्काळ सोडवील आणि त्यांना न्याय देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

तसेच सध्या महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतात पेरलेल्या सर्व पिकांचे नुकसान झाले आहे. शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदाचा तिढा निर्माण झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. हा तिढा सुटत नाही, तोपर्यंत राज्यातील जनतेच्या हितासाठी असा निर्णय घ्यावा, असे श्रीकांत यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मला मुख्यमंत्री करा. शेतकऱ्यांना न्याय देण्याचा मी तुम्हाला विश्वास देतो. माझ्या या निवेदनाची दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही गदळे यांनी राज्यपालांना दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांनी निवासस्थानी केली विठ्ठलाची सपत्नीक पूजा

News Desk

शाळांमध्ये ‘या’ तारखेला आजी आजोबा दिवस साजरा होणार; दीपक केसरकरांची माहिती

Aprna

राज्यपाल काय राज्य चालवतात का? विरोधकांना भेटायचं असेल तर मुख्यमंत्र्यांना भेटा

News Desk