HW News Marathi
महाराष्ट्र

शिवरायांचा अपमान करणाऱ्या श्रीपाद छिंदमचं नगरसेवकपद रद्द….

अहमदनगर | छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरणारा भाजपचा बडतर्फ उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्यावर आज आणखी एक कारवाई करण्यात आली आहे. श्रीपाद छिंदमचं नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव आज अहमदनगर महापालिकेत एकमतानं मंजूर करण्यात आला. इतकंच नव्हे, छिंदमवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा ठरावही महापौरांकडून मंजूर करण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या श्रीपाद छिंदमला ठाकरे सरकारने दणका दिला आहे. महापुरुषाचा अवमान केल्याप्रकरणी सरकारने छिंदमवर ही कारवाई केली आहे.

श्रीपाद छिंदम याने शिवरायांचा अपमान कसा केला ?

कार्यालयीन कामाच्या संदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्याला छिंदम दमदाटी करताना यानं शिवरायांबद्दल अपशब्द वापरले होते. त्यामुळं महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. भाजपनं छिंदमची पक्षातून हकालपट्टी केली होती,मात्र, त्याचं नगरसेवकपद रद्द करावं, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांकडून करण्यात आली होती. त्यासाठी आज अहमदनगर महापालिकेत महासभेचं आयोजन करण्यात आलं होतं. सभागृहात सर्वपक्षीय सदस्यांनी संतप्त भावना व्यक्त करत छिंदमचं नगरसेवकपद रद्द करण्याच्या प्रस्तावाला हात उंचावून पाठिंबा दिला. भाजप गटनेते दत्ता कावरे यांनी मांडलेल्या ठरावाला विरोधी पक्ष नेते बाळासाहेब बोराटे यांनी अनुमोदन दिलं. यावेळी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा ठरावही महापौरांकडून मंजूर करण्यात आला. या महासभेला शिवसेनेचे नगरसेवक काळे कपडे तर नगरसेविका काळ्या साड्या परिधान करून सभागृहात दाखल झाल्या होत्या. शिवसेनेच्या नगरसेवकांनी जयघोष करत शिवाजी महाराजांचा पुतळा सभागृहात आणला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्व समुदायासाठी राज्यातील सर्वात मोठे वसतिगृह मुंबईत उभारणार! – अजित पवार

Aprna

बुलढाण्यात मृत कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबातील २ जण कोरोना पॉझिटिव्ह

News Desk

एकनाथ खडसेंची ५ कोटी ७३ लाखांची मालमत्ता ईडीकडून जप्त!

News Desk