HW News Marathi
महाराष्ट्र

“पाटील रंगेल असावा पण धनंजय मुंडेंसारखा नसावा”, श्रीपाल सबनीसांचा चिमटा

सांगली | सांगलीतील गदिमा कविता महोत्सावाच्या कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी धनंजय मुंडेंच्या प्रकरणावर जोरदार फटकेबाजी केली. पाटील हा खासदार श्रीनिवास पाटलांसारखा रंगेल असावा, पण तो धनंजय मुंडेंसारखा नसावा, असा चिमटा श्रीपाल सबनीस यांनी काढला आहे. आटपाडी तालुक्यातील माडगुळे येते महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद आणि पुण्याच्या गदिमा प्रतिष्ठानच्यावतीने राज्यस्तरीय गदिमा कविता महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं.

राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीसही उपस्थित होते. याप्रसंगी कविता, नृत्य आदी कार्यक्रमांची रेलचेल होती. नृत्याचा कार्यक्रम झाल्यावर मान्यवरांची भाषणं झाली. यावेळी श्रीपाल सबनीस यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांचं कौतुक करतानाच धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला.

यावेळी झालेल्या नृत्याच्या कार्यक्रमाचा धागा पकडत सबनीस यांनी टोलेबाजी केली आहे. “समोर कोणकोण नाचत होत्या. नंतर किती घायाळ झाल्या असतील. मी आमच्या पीडी पाटील सरांबद्दल खात्री देतो. पण, श्रीनिवास पाटी सरांबाबत खात्री देऊ शकत नाही. सबनीसांसारखा रंगेल माणूस मी आयुष्यात कधी पाहिला नाही. पाटील असाच असावा लागतो. परंतु, धनंजय मुंडेंचं जे काही प्रकरण सुरू आहे. तसा पाटील आम्हाला नको”, असं सबनीस म्हणाले आहेत. त्यामुळे यावर आणखी काय प्रतिक्रिया येणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धारावीत ४ नवे कोरोना रुग्ण, एकूण संख्या ४७ वर पोहोचली

News Desk

महाविकास आघाडी सरकार लोकविरोधी सरकार आहे – देवेंद्र फडणवीस

News Desk

वाझे प्रकरणात सरकारने दोषींवर कठोर कारवाई करण्याची भुमिका घेतली त्याची ही प्रतिक्रिया – जयंत पाटील

News Desk