HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसनेने सत्तेच्या बदल्यात स्वाभिमान घरी गुंडाळून ठेवला, श्वेता महालेंची टीका

मुंबई | गेल्या २ दिवसांपासुन स्थानिक पातळीवर शिवसेना आणि राष्ट्रवादीत काहीतरी बिघडलं आहे असं जाणवत आहे. शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादीचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्यात शाब्दिक वाद सुरु आहेत. अशात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आशीर्वाद आहे म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर असल्याच वक्तव्य राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केले होते.

याच वक्तव्यावरून भाजप आमदार श्वेता महाले यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘शिवसनेने सत्तेच्या बदल्यात स्वाभिमान घरी गुंडाळून ठेवला असल्याची’ जहरी टीका महाले यांनी शिवसेनेवर केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आशीर्वाद आहे म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर आहेत, असं वक्तव्य अमोल कोल्हे यांनी केलं होतं.

यावर शिवसनेने उत्तर देताना, जर शरद पवार यांच्या आशीर्वादाने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, मग राष्ट्रवादी कोणाच्या सहकार्याने सत्तेत?” असा सवाल उपस्थिती केला होता. एकीकडे हा वाद सुरु असतानाच, ‘दोन्ही पक्ष काँग्रेसमुळे सत्तेत आहात याची आठवण कॉंग्रेस नेते राजू वाघमारे यांनी करून दिली होती. या तिन्ही पक्षातील या वादावरून श्वेता महाले यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ‘काल राष्ट्रवादी आणि आज काँग्रेस, आघाडीतील नेते दररोज ठरवून मुख्यमंत्र्यांचा जाहीर अपमान करत आहेत. सेनेनं मात्र सत्तेच्या बदल्यात स्वाभिमान घरी गुंडाळून ठेवला आहे, असा टोला श्वेता महाले यांनी लगावला आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांमध्ये विविध मुद्यांवरून वाद पाहायला मिळत आहे. मात्र याचाच फायदा घेत विरोधक सत्ताधारी पक्षावर टीका करण्याची कोणतेही संधी सोडत नसल्याचे सुद्धा पाहायला मिळत आहे. आता हा वाद स्थानिक पातळीवरून पुढे येणार की तिथेच मिटला जाणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दापोलीत अनिल परब आघाडीवर, तर रामदास कदमांना धक्का!

News Desk

फडणवीस कितीही प्रयत्न करा, बिघाडी काही होत नाही उलट आघाडी सरकार मजबूत होईल !

News Desk

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात फोन टॅपिंग प्रकरणी गुन्हा दाखल

Aprna