HW News Marathi
महाराष्ट्र

लॉकडाऊननंतर सिद्धिविनायक मंदिर भाविकांसाठी खुले

मुंबई। अंगारक संकष्टी चतुर्थीचं औचित्य साधत लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच सिद्धिविनायक मंदिर खुले केले आहे. सिद्धिविनायच्या दर्शनासाठी देशभरातून भावीक येथे येतात. तब्बल दोन वर्षापासून सिद्धिविनायक मंदिर बंद करण्यात आले होते. सिद्धिविनायक मंदिरात मध्य रात्री १.३० वाजल्यापासून दर्शनला सुरुवात झाली आहे. सिद्धिविनायक मंदिर हे आज (२३ नोव्हेंबर) भाविकांसाठी खुले राहणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून मिळाली आहे.

तब्बल दोन वर्षापासून देशात कोरोना सावट आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे बंद करण्यात आली. परंतु लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर राज्यातील काही मंदिरे उघडण्यात आली होती. पण, सिद्धिविनायक मंदिर बंदच होतं. आता मंदिर खुले झाल्यानंतर कोरोनाचे संकट लवकरात लवकर जावं, अशी प्रार्थना सिद्धिविनायक चरणी प्रार्थना आपण करू.

 

ऑनलाइन क्यूआर कोडद्वारे मंदिरात प्रवेश

कोरोना च्या नियमांचं पालन करूनच मंदिर खुले करण्यात आलं आहे, असं सिद्धिविनायक मंदिराच्या कार्यकारी अधिकारी नंदा राऊत यांनी सांगितलं. तसेच भाविकांना ऑनलाइन क्यूआर कोडद्वारे मंदिरात प्रवेश दिला जाईल, तर मंदिरात अडीच हजार भाविकांना दर्शनाची व्यवस्था करण्यात आली, असेही त्या म्हणाल्या.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मुंबई कोस्टल रोडमध्ये १ हजार ६०० कोटींचा भ्रष्टाचार’ – आशिष शेलार

News Desk

मर्दानगीच्या पोकळ भाषेपेक्षा नामांतर करुन खरी मर्दानगी दाखवा, तुषार भोसलेंचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

News Desk

राजकारणाची खाज शमली असेल तर देशापुढील गंभीर समस्यांकडे वळायला हरकत नाही

News Desk