HW News Marathi
महाराष्ट्र

संतोष परब हल्लाप्रकरणी नितेश राणेंना जामीन मंजूर

मुंबई | शिवसेना पदाधिकारी संतोष परब हल्लाप्रकरणी भाजप नेते नितेश राणे यांना सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. नितेश राणेंना ३० हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. नितेश राणेंसह स्वीय सहाय्यक राकेश परबला जामीन मंजूर झाला आहे. दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत कणकवलीत येण्यास बंदी घातली आहे. नितेश राणेंना ओरोस पोलीस स्थानकात आठवड्यातून एकदा सकाळी १० ते १२ या वेळेत हजेरी लावावी लागणार आहे. नितेश राणेंना न्यायालायने वास्तव पत्ता देण्यावे लागणार असून पोसील बोलवतील त्यावेळी चौकशीला त्यांना हजर रहावे लागणार आहे.

संतोष परब हल्लाप्रकरण हे सुरुवातीला सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयतून मुंबई उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आणि दिवाणी न्यायालय या ठिकाणी यांची सुनावणी झाली. शेवटी आज (९ फेब्रुवारी) सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणेंना जामीन मंजूर झाला आहे. दरम्यान, यापूर्वी नितेश राणेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यावेळी पोलिसांनी त्यांची पाच तास चौकशी केली होती. या चौकशीच्या आधारे राणेंना गोव्यात नेहून या प्रकरणाची तपास केला. यानंतर राणेंना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. तेव्हा नितेश राणेंना छातीत दुखू लागले होते. या पार्श्वभूमीवर राणेंवर उपचार करण्यासाठी त्यांना कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात नेहण्यात आले होते. 

नेमके काय आहे प्रकरण

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या निवडणूक प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबर रोजी प्राणघातक हल्ला झाला. त्यांच्यावर हल्ला करणारा प्रमुख आरोपी सचिन सातपुते याला पोलिसांनी दिल्लीहून अटक केली. तसेच या प्रकरणातील एकूण सहा संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर चौकशीदरम्यान नितेश राणेंचे नाव समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणी नितेश राणेंवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आयपीसी कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न), कलम १२० (बी) (गुन्हेगारी कट रचणे), कलम ३४ (समान उद्देश) अंतर्गत गुन्हा दाखल करून आठ जणांना अटक केली आहे. दरम्यान, राणेंनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. यानंतर राणेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्जमाफीचा निर्णय घ्या अन्यथा मुंबईचा दूध आणि भाजीपाला रोखणार- खा. शेट्टींचा इशारा

News Desk

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एकनाथ खडसे विरुद्ध रक्षा खडसे!

News Desk

एसटी महामंडळाला १५ कोटीचे नुकसान, कर्मचाऱ्यांचा आजही संप सुरुच

News Desk