HW News Marathi
महाराष्ट्र

नितेश राणेंना धक्का! न्यायालयाने फेटाळला अटकपूर्व जामीन

मुंबई | शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. या प्रकरणी आज (३० डिसेंबर) न्यायालयात सुनावणी सुरू होती. या प्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे राणेंच्या वकीलांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. राणेंचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर कणकवलीत शिवसैनिकांनी फटाके फोडले. यामुळे आता नितेश राणे यांना अटक अटळ असल्याचे बोलले जाते. 

संतोष परबांना १८ डिसेंबरला कणकवलीमध्ये नितेश राणेंनी मारहाण केली होती. यानंतर परबांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याची पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तपास केल्यानंतर त्यांनी परब हल्ल्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन सातपुते याला अटक केली. पोलिसांच्या चौकशीदरम्यान सातपुतेंनी नितेश राणेंचे नाव समोर आले. कणकवली पोलिसांकडून राणेंची चौकशी होणार असून राणे हे गेल्या चार दिवसांपासून नॉट रिचेबल येत आहेत. नितेश राणेंच्या प्रकरणाची गेल्या दोन दिवसांपासून सुनावणी सुरू होती.  नितेश राणे कुठे आहेत, हे सांगण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस पाठवली होती. परंतु नारायण राणे पोलिसांसमोर उपस्थित राहिले नाही. 

सिंधुदुर्ग जिल्हा बँके निवडणुकीसाठीचे मतदान

आज सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडतली. मात्र, नितेश राणेंना त्यांचा मतदानाचा हक्क नाकारण्यात आल्यामुळे त्यांना मतदान करता आले नाही. तसेच १६ कोटींच्या थकीत कर्जामुळे नितेश राणेंविरोधात सहकार विभागाकडून हा कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याचे आहे. काही वेळापूर्वीच मतदान प्रक्रिया संपली असून नितेश राणेंना मतदान न करता आल्याने शिवसैनिकांनी मतदान केंद्रबाहेर आनंद व्यक्त केला होता. त्यावेळी शिवसैनिक आणि राणे समर्थक आमने-सामने आले होते. कोणत्याही प्रकारचा अनर्थ घडू नये, म्हणून या ठिकाणी पोलिकांचा कडक बंदोबस्त करण्यात आला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बैलगाडी नदीत पडून शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू 

News Desk

वर्नोन गाेन्सालवीस, अरुण फरेरा काेर्टात हजर

News Desk

ठाकरेंची सून होण्यापेक्षा राज ठाकरेंच्या मनसेची कार्यकर्ती होणं कठीण- शालिनी ठाकरे

News Desk