HW News Marathi
महाराष्ट्र

नितेश राणेंना मोठा धक्का! सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालायने जामीन अर्ज फेटाळला

मुंबई | संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांचा अटक पूर्व जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालायने फेटाळून लावला आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे नितेश राणेंना मोठा धक्काबसला आहे. यामुळे आता नितेश राणेंला अटक अटळ आहे. नितेश राणेंवर आज (१ फेब्रुवारी) न्यायालयात सुनावणी पार पडली. यानंतर आता नितेश राणेंच्या गाडी अडवण्यावरून पोलिसांसोबत शाब्दिक वाद झाले. याठिकाणी काही वेळासाठी तणाव निर्माण झाला होता. राणेंना दहा दिवस अटकेपासून संरक्षण दिले, मात्र राणेंना पुन्हा सत्र न्यायालयाचा रस्ता दाखवला. त्यानंतर राणेंच्या जामीन अर्जावर काल आणि आज सुनावणी पार पडली. मात्र सत्र न्यायालयानेही राणेंचा जामीन अर्ज फेटाळत, नितेश राणेंच्या अटकेवर शिक्कामोर्तब केले.

 न्यायालयाने राणेंचा जामीन फेटाळल्यानंतर सिंधुदुर्ग कोर्टासमोर मोठा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. यावेळी राणेंंचा जामीन फेटाळल्यानंतर भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. तर यावेळी त्यांचे बंधू आणि माजी खासदार निलेश राणे हेही आक्रमक पवित्रा घेताना दिसून आले. जामीन अर्ज फेटाळल्याचा निकाल न्यायालयाने दिल्यानंतर नितेश राणे न्यायालयाबाहेर येऊन आपल्या गाडीमध्ये बसले. मात्र, त्यांची गाडी पोलिसांनी अडवून ठेवल्याने निलेश राणे चांगलेच संतापले आणि गाडी का अडवली असा जाब ते थेट पोलिसांनाच विचारु लागले.

नितेश राणे न्यायालयातून निघत असताना पोलिसांनी न्यायलयाबाहेरच त्यांची गाडी अडवली आहे. यावेळी पोलीस राणेंच्या गाडीसमोर उभे राहिले आणि ते फोनवर वरिष्ठांशी बोलत असल्याचे सांगू लागले. मात्र बराच वेळ हा प्रकार सुरु असल्याने निलेश राणे संतापले आणि पोलिसांसोबत वाद घालू लागले. “कुठल्या अधिकाराखाली गाडी थांबवलीय सांगा,” असं म्हणत निलेश राणे पोलिसांवर भडकताना दिसून आले. 

नेमके काय आहे प्रकरण

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे निवडणूक प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबर रोजी प्राणघातक हल्ला झाला. त्यांच्यावर हल्ला करणारा प्रमुख आरोपी सचिन सातपुते याला पोलिसांनी दिल्लीहून अटक केली. तसेच या प्रकरणातील एकूण सहा संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर चौकशीदरम्यान नितेश राणेंचे नाव समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणी नितेश राणेंवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आयपीसी कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न), कलम १२० (बी) (गुन्हेगारी कट रचणे), कलम ३४ (समान उद्देश) अंतर्गत गुन्हा दाखल करून आठ जणांना अटक केली आहे. दरम्यान, राणेंनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. यानंतर राणेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देवेंद्र फडणवीसांच्या ‘सामना’तील मुलाखतीचा मुहूर्त लवकरच कळेल!

News Desk

मलिकांनी मेहुणीवर केलेल्या आरोपानंतर समीर वानखेडेंचं प्रत्युत्तर

Gauri Tilekar

बीड जिल्ह्यात पालकमंत्री मुंडेंकडून 24 तास सतर्क राहण्याच्या जिल्हा प्रशासनाला सूचना!

News Desk