HW News Marathi
महाराष्ट्र

“कलंकित सचिन वाझेंना पाठीशी घालुन उद्धव ठाकरेंनी राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवली”

पुणे | API सचिन वाझे यांना मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या संदर्भात ही स्फोटक गाडीत त्यांनी प्लॅंट केल्याचा आरोप करत NIA ने अटक केली आहे.त्यावरून भाजपने महाविकासआघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय की ,एनआयएने दहशतवादी कटात अटक केलेल्या पोलीस अधिकाऱ्याला कालपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री पाठीशी घालत होते ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे. एका कलंकित अधिकाऱ्याला पाठीशी घालून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची आणि राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवली असे त्यांना वाटत नाही का?’असा सवाल चंद्रकात पाटलांनी उपस्थित केला आहे.

पुढे चंद्रकात पाटील म्हणतात ,शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिक सचिन वाझे यांचा बचाव का केला? हे समजण्यापलीकडचे आहे. आपल्या लोकशाही व्यवस्थेत कोणताही राजकीय पक्ष प्रथम आपल्या संविधानाशी निष्ठा बाळगतो आणि नंतर जनतेचा पाठिंबा मिळवतो, परंतु येथे उद्योगपतींच्या घातपाताची व समाजातील शांतता भंग करणाऱ्यांचे शिवसेना समर्थन करत होती.मनसुख हिरेन यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने अनेक प्रश्न उपस्थित केले होते. ज्याची उत्तरे महाराष्ट्राची जनताही शोधत आहे. वाझे यांचे समर्थन का केले जात होते? कोणते मंत्री, आमदार आणि राजकीय नेत्यांना या संपूर्ण घटनेची कल्पना होती आणि तरीही त्यांनी मौन बाळगले? कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना हे सर्व माहित होते आणि तरीही त्यांनी मौन बाळगले?

हे केवळ हत्येचे प्रकरण नाही, तर हा देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट होता. ज्यामध्ये एक पोलीस अधिकारी संशयास्पदरित्या सहभागी होता. पण जनतेला महाराष्ट्र पोलिस, मुंबई पोलिस आणि एनआयएवर पूर्ण विश्वास आहे आणि ते याप्रकरणाचा तपास करुन खऱ्या सूत्रधाराला अटक करुन या प्रकरणाचा लवकरच पर्दाफाश करतील, अशी आशा आहे,असे चंद्रकात पाटील यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

साहेबांचं नेतृत्व हे लाटातून आलेलं नाही…विरोधकांच्या स्वप्नांवरही पाणी फिरवलं ते पवारांच्या भाषणाने ! रोहित पवारांकडून आठवणींना उजाळा…

News Desk

आता सत्ता स्थापनेसाठी आम्हाला काही घाई नाही !

News Desk

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून काँग्रेसला कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू! कॉंग्रेस नेत्याच्या निकटवर्तीयांचा आरोप

News Desk