HW News Marathi
Covid-19

कोविडसंदर्भात आतापर्यंत राज्यात १ लाख १४ हजार गुन्हे दाखल

मुंबई | “राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील १ लाख १४ हजार गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच विविध गुन्ह्यांसाठी ५ कोटी ३५ लाख ३९ हजार ९४७ रुपयांचा दंड आकारण्यात आला”, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजेच २२ मार्च ते २४ मे या कालावधीत कलम १८८ नुसार १ लाख १४ हजार २४७ गुन्हे नोंद झाले असून २२,८६७ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तसेच पोलिसांवर हल्ला होण्याच्या २४८ घटना घडल्या. त्यात ८३० व्यक्तींना ताब्यात घेतले आहे.

१०० नंबर

पोलीस विभागाचा १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो. मात्र, लॉकडाऊनच्या काळात या ‘१०० नंबर’वर प्रचंड भडिमार झाला आहे. या क्रमांकावर आतापर्यंत ९५,९११ फोन आले असून त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली आहे. तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे अशा ६९५ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले आहे. राज्यात एकूण ५,३४,४९४ व्यक्ती Quarantine आहेत, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली.

अत्यावश्यक सेवेसाठी आतापर्यंत पोलीस विभागामार्फत ४,१५,५९१ पास देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३२२ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ७१,०४५ वाहने जप्त करण्यात आली. तसेच परदेशी नागरिकांकडून झालेले व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.

पोलिसांसाठी कोरोना विशेष कक्ष

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने मुंबईतील १० पोलिस व १ अधिकारी असे एकूण ११, पुणे २, सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण १, ए.टी.एस.१, ठाणे शहर १ अशा १८ पोलीस वीरांना आपला जीव गमवावा लागला. राज्यात सध्या ९० पोलीस अधिकारी व ३५२ पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना लसीकरणात महाराष्ट्राने २ कोटींचा ओलांडला टप्पा!

News Desk

जनाची नाही पण मनाची असेल तर काँग्रेसने सत्तेतून बाहेर पडावे !

News Desk

कोरोनाच्या अजून किती लाटा येणार, सांगू शकत नाही’! –  तात्याराव लहाने

News Desk