HW News Marathi
महाराष्ट्र

….तर मी राजीनामा देतो, ओबीसी आरक्षणावरुन विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान!

मुंबई। राज्यातल्या ओबीसी आरक्षणाचा प्रश्न अजूनही सुटेल असं दिसत नाही. आगामी पोटनिवडणुकांच्या बाबतीत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याविषयी आपलं मत मांडलं आहे. त्यांनी यावेळी राजीनामा देण्याची तयारीही दाखवली आहे.यावेळी माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, संपूर्ण देशातलं ओबीसी आरक्षण सध्या धोक्यात आलेलं आहे. अशा परिस्थितीत आमचं डेटा एकत्र करण्याचं काम आम्ही करुच. मात्र आम्हाला अध्यादेश काढून या निवडणुका पुढे ढकलता येतात का याचा विचार आम्ही करु. काहीही मार्ग सापडला नाही तर सर्वच पक्षांनी निवडणुकांना ओबीसी उमेदवार उभे करावेत.

हा मुद्दा वाढवणं केवळ राजकीय हेतूने चाललं आहे

सर्व पक्षांचं एकमत घेऊनच निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय सर्व पक्षांच्या संमतीने घेतला जाईल असंही त्यांनी अधोरेखित केलं आणि आजच्या या परिस्थितीला भाजपा जबाबदार आहे, महाविकास आघाडी किंवा काँग्रेस नाही असा आरोपही त्यांनी केला आहे. त्याचबरोबर माझ्या राजीनाम्याने जर हा प्रश्न सुटणार असेल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे असंही ते म्हणाले आहे. त्याचबरोबर हा मुद्दा वाढवणं केवळ राजकीय हेतूने चाललं आहे. जनतेला सगळं कळत आहे असंही वडेट्टीवार म्हणाले.

सर्वच राजकीय पक्षांची भूमिका दुटप्पी

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना टार्गेट केलं आहे. वडेट्टीवार यांनी विरोधकांच्या टीकेला पलटवार दिला आहे. माझ्या राजीनाम्याने प्रश्न सुटणार असेल तर राजीनामा देतो, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. तसेच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वच राजकीय पक्षांची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोपही त्यांनी केला.

ओबीसींच्या जखमेवर मीठ चोळणारे

विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं. पाच जिल्ह्यात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होत आहेत. याला काँग्रेस जबाबदार नाही. याला भाजपच जबाबदार आहे. हे त्यांनी मान्य करावं. महाविकास आघाडी ओबीसी आरक्षण जाण्यास जबाबदार असल्याचं त्यांना वाटत असेल तर ते जनतेची दिशाभूल करत आहेत. ओबीसींच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे. तत्कालीन सरकारने पाठवलेले ते सहा पत्रं त्याचा पुरावा आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एसटी महामंडळ सर्वसामांन्यांसाठी लवकरच पेट्रोल पंप सुरु करणार ..!

News Desk

पोलीस बदलीबाबत सिताराम कुंटे यांचे अनिल देशमुखांवर गंभीर आरोप

News Desk

राज्यातील कोविड परिस्थितीचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

Aprna