बीड। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आज बीड शहरात होत्या. एका निष्ठावंत कार्यकर्त्याने पानटपरिला भेट देण्याचा आग्रह केल्याने पंकजा मुंडे या तिथे गेल्या. विशेष म्हणजे त्यांनी स्वतःला खाण्यासाठी स्वतःच पानाचा विडाही बनविला.हा व्होडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. तर राजकारणात काम करीत असताना पंकजा मुंडे यांनी कोणालाही चुना लावण्याचे काम केले नाही ते त्यांना जमत ही नाही अशी चर्चा या व्हिडीओ मध्ये रंगताना दिसून आली.
पंकजा मुंडे यांना चुना लावायला येत नाही
यावेळी कार्यकर्त्यांनी विनोदी भाषेत म्हटलं आहे की, पंकजा ताईला एकच गोष्ट करता येत नाही ती म्हणजेच चुना लावायला येत नाही, यावर पंकजा मुंडे म्हणल्या की, कार्यकर्त्यांना तरी येतो ना चुना लावायला.या व्हिडीओ ने जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे. झाल अस की, पंकजा मुंडे औरंगाबादहून परळीकडे जात होत्या, बीडमध्ये दैनिक पार्श्वभूमीचे संपादक गंमत भंडारी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी कार्यालयात गेल्या होत्या, पंकजा मुंडे बशीरगंज भागात आल्याचे समजताच या भागातील शेख जमील यांनी त्यांना त्यांच्या जमील पान सेंटरला भेट देण्याचा आग्रह केला, पंकजा मुंडेनी त्यांना लगेच होकार दिला आणि तीथे पोहोचल्या आणि लोकांमध्ये मिसळल्याही.
पान सेंटरमध्ये गेल्यावर स्वतः पान तयार करण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही, त्यांनी स्वतः पानाचा आस्वाद तर घेतलाच पण सोबतच्या सर्व सहकाऱ्यांनाही पान बनवून दिले. या प्रसंगाने उपस्थित गर्दीला लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचीच आठवण आली. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, रमेश आडसकर, अक्षय मुंदडा, सर्जेराव तांदळे आदी यावेळी सोबत होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.