HW News Marathi
महाराष्ट्र

दिवाळीमध्ये शिवसेनेचे सीमोल्लंघन, प्रवीण दरेकरांनी शुभेच्छा देत लगावला टोला

मुंबई। दादरा नगर हवेलीमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर विजयी झाल्या आहेत. शिवसेनेचा या विजयामुळे महाराष्ट्राबाहेर पहिला खासदार झाला आहे. दिवाळीमध्येच शिवसेनेने सीमोल्लंघन केलं आहे. तसेच राज्यातील विधानसभा पोटनिवडणूक महाविकास आघाडी विजयी झाली आहे. यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या असून हिंदूत्वावर टोला लगावला आहे. ज्यांनी आतापर्यंत हिंदूत्वाला विरोध केला त्यांच्यासोबत सरकार आणि आता राष्ट्रीय राजकारणात गेले असा टोला दरेकरांनी लगावला आहे.

त्यामुळे आमच्या त्यांना शुभेच्छा असतील

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पोटनिवडणुकांच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी राज्यात विजयी झालेल्या महाविकास आघाडीला आणि दादरा नगर हवेली येथे विजय मिळवलेल्या शिवसेनेला दरेकरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. शिवसेनेनं राष्ट्रीय पातळीवर जी कामगिरी केली आहे. त्याबाबत त्यांना शुभेच्छा आहे. महाविकास आघाडी सरकारबरोबर हातमिळवणी करुन अनैसर्गिक सरकार केलं आहे. राष्ट्रीय राजकारणात गेले आहेत. मराठी अस्मिता, प्रादेशिक अस्मिता, हिंदूत्व गुंडाळून ठेऊन ज्यांनी आयुष्यभर हिंदूत्वाला विरोध केला, अस्मितेला विरोध केला. आपल्या स्वाभिमानाला विरोध केला त्यांच्यासोबत सरकारमध्ये गेल्यामुळे आणि आता दादरा नगर हवेली येथे जागा आल्यामुळे ते राष्ट्रीय राजकारणात जाणार असतील तर महाराष्ट्रातील नेता पुढे जात आहे त्यामुळे आमच्या त्यांना शुभेच्छा असतील असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.

दादरा नगर हवेलीमध्ये कलाबेन डेलकर विजयी

दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. त्यांच्या निधनामुळे एक जागा रिक्त झाली होती. या जागेवर शिवसेनेकडून मोहन डेलकर यांच्या पत्नी उमेदवार होत्या. कलाबेन डेलकर यांनी भाजपवर प्रतिहल्ला चढवण्याचे सोडून आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली. यामुळे जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला. कलाबेन डेलकर या भरगोस मतांनी विजयी झाल्या आहेत. डेलकर यांच्या विजयामुळे शिवसेनेचा आणखी एक खासदार वाढला असून पहिल्यांदाच महाराष्ट्राबाहेर खासदार झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुजय विखे-बाळासाहेब थोरात यांच्या एकत्र विमान प्रवासामुळे राजकीय वर्तुळात चर्चा

News Desk

वाधवान ग्रुपचे भाजपशीच आर्थिक लागेबांधे, काँग्रेसचा गंभीर आरोप

News Desk

‘‘भाजप-सेनेच्या भांडणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन कोल्हे’, सदाभाऊंचा घणाघात!

News Desk