HW News Marathi
महाराष्ट्र

“…तर ते कोणत्या नशेत बरळतात याचा एनसीबीने तपास करावा”,राऊतांचा कंगनाला टोला!

मुंबई। बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने आता पुन्हा एकदा आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग यांना त्यांच्याकडून कोणताही पाठिंबा मिळाला नाही असा दावा करताना दुसरा गाल पुढे केल्याने भीक मिळते, स्वातंत्र्य नाही, असं म्हणत कंगनाने अहिंसेची खिल्ली उडवली आहे. तिच्या या वक्तव्यावरुन सर्व क्षेत्रातून तिच्यावर टीका करण्यात आली. आणि याबरोबरच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही कंगनावर टीका केली आहे. याआधी देखील कंगनाने गेल्या आठवड्यात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

मॅडमना माहित असायला हवं

आता आपण पाहत आहोत की, चीनने आतमध्ये घुसून आपल्या कानाखाली मारली आहे आणि आता दुसरा गालही पुढे करत आहेत. काश्मीरमध्ये पंडितांची हत्या होत आहे. देशात काय परिस्थिती आहे या मॅडमना माहिती असायला पाहिजे. महात्मा गांधी विश्वाचे नायक होते. बाळासाहेब ठाकरे यांनीही गांधींच्या विचारांवर अनेकवेळा टीका केली होती. तरीही महात्मा गांधी स्वातंत्र्य संग्रामचे ते नायक होते हे मानायलाच पाहिजे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा गांधी जयंतीला राजघाटवर जाऊन गांधीच्या स्मारकावर जाऊन श्रद्धांजली वाहतात. हे या मॅडमना माहित असायला हवं की संपूर्ण देश आणि जग आजही गांधींच्या विचारांनी प्रभावित आहे.वेडे लोकं बरळत असतात. ते का बरळतात? ते कोणत्या नशेत असतात? त्यांना या नशेचा पुरवठा कोण करतं? एनसीबीने त्याचा तपास करावा ही मागणी करत आता संजय राऊत यांनी टोला लगावला आहे.

कंगना आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये काय म्हणाली?

इंस्टाग्रामवर कंगनाने एका आर्टिकलचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करून तिने लिहीले, ‘तुम्ही एकतर गांधीजींचे फॅन होऊ शकता किंवा नेताजींचे समर्थक. तुम्ही दोघांचे समर्थक होऊ शकत नाही. त्यामुळे हा निर्णय स्वत: घ्या.’ कंगनाने आणखी एका पोस्टमध्ये लिहीले, ‘जे स्वातंत्र्यासाठी लढत होते, त्यांना त्यांनी आपल्या मालकांकडे सोपवले. ते सत्तेचे भुकेले आणि धूर्त होते त्यांच्यामध्ये हिंमत नव्हती. हे तेच लोक होते ज्यांनी आपल्याला शिकवले की जर कोणी तुमच्या एका गालावर चापट मारली तर दुसरा गाल त्यांच्यासमोर ठेवा, असं केल्याने तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल. अशाने स्वातंत्र्य मिळत नाही, फक्त भीक मागते, विचार करून तुमचे हिरो निवडा.’ पुढे कंगना म्हणाली, ‘गांधीजींनी भगत सिंग, सुभाष चंद्र बोस यांचे कधीच समर्थन केले नाही. काही पुरावे आहेत, ज्यावरून वाटते की गांधीजींची इच्छा होती की, भगत सिंग यांना फाशी मिळावी.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय

Aprna

OBC समाजाच्या मागण्यांबाबत भुजबळांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक

News Desk

कॅप्टन अमरिंदर सिंग लवकरच स्वतःचा नवा पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत!

News Desk