HW News Marathi
Covid-19

दारूचे कारखाने लाॅकडाऊन काळातही सुरू होते का?, विश्वंभर चौधरींचा सरकारला सवाल

मुंबई | मुंबई महानगर प्रदेशातील सर्व महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेशातील महानगरपालिका व मालेगाव महानगरपालिका हद्द वगळता इतर सर्व रेड, ऑरेंज व ग्रीन झोनमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसह जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंची एका लेनमधील पाच दुकाने सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली असून त्या पाच दुकानांमध्ये मद्य विक्रीच्या दुकानांचाही समावेश असल्याची माहिती राज्य शासनाच्या वतीने देण्यात आली. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी उद्यापासून दारूची दुकाने सुरू होत आहेत म्हणजेच दारूचे कारखाने लाॅकडाऊन काळातही सुरू होते का?, असा सवाल उपस्थित करत फेसबुकद्वारे सरकारव टीका केली आहे.

सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी म्हणाले, “उद्यापासून दारूची दुकाने सुरू होत आहेत म्हणजेच दारूचे कारखाने लाॅकडाऊन काळातही सुरू होते का? लाॅकडाऊन काळात फक्त औषधी कारखान्यांना परवानगी होती असे ऐकून होतो. मग आता विक्रीसाठी स्टाॅक कुठून आला?” कोवीड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनाने लॉकडाऊन १७ मे पर्यंत वाढविल्यानंतर काल (२ मे) राज्य शासनाच्या वतीने सुधारित नियमावली जारी करण्यात आली. या नियमावलीतील तरतुदीसंदर्भात आज (३ मे) प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी माहिती दिली.

राज्य सरकारचा निर्णय

केंद्र शासनाने राज्यातील १४ जिल्हे हे रेडझोनमध्ये समाविष्ट केले आहेत. याशिवाय राज्य शासनाने मुंबई महानगर प्रदेशातील सर्व महानगरपालिका हद्द, पुणे महानगरप्रदेशातील सर्व महानगरपालिका व मालेगाव महापालिका हद्दीचा समावेश रेडझोनमध्ये केला आहे. केंद्र शासनाने ऑरेंज व ग्रीन झोनमध्ये काही अपवाद वगळता बहुतेक निर्बंध शिथिल केल्या आहेत. मात्र, मुंबई व पुणे प्रदेशात कोरोनाचा प्रसार अद्याप आटोक्यात आलेला नसल्यामुळे तेथील ॲक्टिव्हिटी मर्यादीत ठेवल्या असून काही बाबींवर निर्बंध तसेच ठेवले आहेत. मुंबई प्रदेशातील महानगरपालिका (एमएमआर रिजन), पुणे, पिंपरी चिंचवड व मालेगाव महानगरपालिका हद्दी या रेडझोनमध्ये येत असून येथील उद्योग सुरू करण्यास अद्याप परवानगी दिली नाही. तसेच या झोनमध्ये खासगी कार्यालयेही बंदच राहणार आहेत. मात्र, या व्यक्तिरिक्त असलेल्या रेड, ऑरेंज व ग्रीन झोनमध्ये काही अटींवर खासगी कार्यालये सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. रेडझोनमध्ये शासकीय कार्यालये ही पूर्वीप्रमाणे 5 टक्के कर्मचाऱ्यांसह सुरू राहतील. तसेच ग्रीन व ऑरेंज झोनमध्ये 33 टक्के कर्मचाऱ्यांसह खासगी व शासकीय कार्यालये सुरू राहतील, असेही श्री. गगराणी यांनी स्पष्ट केले आहे.

ऑरेंज व ग्रीन झोन व्यक्तिरिक्त कंटेन्टमेंट झोन वगळता इतर रेड झोनमध्ये जीवनावश्यक वस्तूच्या दुकानांबरोबरच रस्त्याच्या एका बाजूकडील (एका लेनमधील) जीवनावश्यक वस्तू नसलेली स्वतंत्रपणे असलेली पाच दुकाने (स्टॅंड अलोन) सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या पाच दुकानांमध्ये मद्य विक्रीच्या दुकानाचा समावेश आहे. मात्र, एका लेनमध्ये पाचपेक्षा जास्त जीवनावश्यक नसलेली दुकाने सुरू करता येणार नाहीत. ही दुकाने सुरू करताना सोशल डिस्टन्सिंग, गर्दी न करणे यासारखी इतर नियमांचे कडकपणे पालन करणे आवश्यक असणार आहे. तसेच शॉपिंग मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट, बाजार यामधील दुकाने ही बंदच राहतील, असेही त्यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात राजेश टोपेंच्या उपस्थितीत जालनातून १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात

Aprna

“एकाच आयुष्यात सोंगं करायची तरी किती?”, भाजपने मुख्यमंत्र्यांना डिवचले

News Desk

देशात लॉकडाऊन काळात गर्भनिरोधकांचा अपुरा साठा

News Desk