HW News Marathi
महाराष्ट्र

सामाजिक कार्यकर्त्या ॲड. अपर्णा रामतीर्थकर यांचे निधन

सोलापूर | ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ॲड. अपर्णा अरुण रामतीर्थकर यांचे सोलापूर येथे आज (२८ एप्रिल) सकाळी ११.४५ वाजता अश्विनी सहकारी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. पक्षाघाताचा झटका आल्याने गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मृत्यूसमयी त्या ६५ वर्षांच्या होत्या. त्यांच्यामागे एक मुलगा, सून, नातू असा परिवार आहे. ज्येष्ठ पत्रकार कै. अरुण रामतीर्थकर यांच्या त्या पत्नी होत.

रामतीर्थकर यांनी मुलाचे शिक्षणपूर्ण होईपर्यंत फक्त घर सांभाळले. मुलगा स्वावलंबी होताच १९९६ मध्ये अपुरे शिक्षण पूर्ण करत बी.ए.ची पदवी घेतली. त्यानंतर लगेच एलएलबी झाल्या. न्यायालयात पीडित महिलांची दु:खे आणि वकिलांचे वर्तन पाहून त्यांनी अशी वकिली करायची नाही, असे ठरवले. अशील आणि प्रतिवादी यांच्यात समेट घडवून आणू लागल्या. नकळत त्या हजारो घरांपर्यंत पोहोचल्या. २००१पासून त्या सामाजिक कार्यात आहेत. २००८ पासून ‘चला नाती जपू या’, ‘आईच्या जबाबदार्‍या’ या विषयांवर त्यांनी तीन हजाराहून अधिक भाषणे दिली आहेत. तुटणारी घरे वाचली पाहिजेत आणि लव्ह जिहादच्या आक्रमणापासून आपल्या मुलीबाळींना अन् स्त्रियांना वाचवले पाहिजे, या भावनेने त्या कार्य करत होत्या.

महिन्यातून २६ ते २८ दिवस एसटी बसने प्रवास करून व्याख्याने देणार्‍या श्रीमती अपर्णा रामतीर्थकर यांच्या भूमिकेवरून अनेकदा वादही झाले. सोलापुरातील पाखर संकुल, उद्योगवर्धिनी आदी संस्थांवर त्या अखेरपर्यंत कार्यरत होत्या. विविध वृत्तपत्रांसाठी महिला आणि इतर विषयावर त्यांनी पुष्कळ स्तंभलेखन केले. आपले संपूर्ण मानधन सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील पारधी मुलांच्या वसतीगृहासाठी देऊन अनेक वर्षे त्यांनी तेथील आश्रमशाळा उभी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गणेशोत्सवात जुगार खेळू देण्याची आमदार, खासदारांची मागणी

News Desk

कुठे जन्मले दुतोंडी बालक

News Desk

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा; उद्या राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

Aprna