HW Marathi
महाराष्ट्र

सोलापुरात पोलीस चकमकीदरम्यान १ दरोडेखोर

सोलापूर | उळे येथे पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये आज (१० फेब्रुवारी) पहाटे झालेल्या चकमकीत एक दरोडेखाेर ठार झाला असून एका पोलीस निरीक्षकासह दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमी पोलीस कर्मचाऱ्यांना उपचारासाठी अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील, पोलीस कॉन्स्टेबल विकास फडतरे आणि विक्रम दराडे हे जखमी आले आहेत. तसेच उळे गावात कडेकोट पोलिस बंदोबस्त देण्यात आला आहे.

रविवारी पहाटे अडीच ते साडेतीनच्या दरम्यान उळे गावाजवळ गस्त घालताना पोलिसांना पाच ते सहा दरोडेखोरांशी सामना झाला. यात पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्‍यांनी पोलिसांशी वाद घाण्यास सुरुवात केली. त्‍यामुळे पोलिसांनी त्‍यातील एकाला पकडून पोलीस गाडीत बसविण्याचा प्रयत्‍न केला. त्‍याचवेळी पकडलेल्‍या दरोडेखोराने साहेब चुकले म्हणत हातातील तलवारीने पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील यांच्या हातावर आणि मांडीवर वार केला. या हल्ल्यात प्रत्‍युत्‍तर देण्यासाठी पाटील यांनी दरोडेखोरावर गोळीबार केला. त्‍यात तो जखमी झाला असून पोलिसांनी त्‍याला उपचारासाठी सरकारी रुग्‍णालयात दाखल केले. परंतु, उपचार सुरू असतानाच त्‍याचा मृत्यू झाला.

Related posts

आघाडी सरकारच्या काळात सिडकोला जमीनी दिल्या | मुख्यमंत्री

News Desk

आरक्षणात बदल होणार नाही | तावडे

News Desk

पवारांची केंद्रावर टीका

News Desk