HW News Marathi
देश / विदेश

सोनिया गांधींनी बोलावली महत्वपूर्ण बैठक! महाराष्ट्रातील राजकारणावर होणार चर्चा?

नवी दिल्ली। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर दिल्लीला पहिल्यांदाच गेलेत. शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात दिल्लीत एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. आणि त्यानंतर लगेचच विरोधी पक्षातील मोठ मोठ्या नेत्यांची बैठक होणार आहे. अस असताना दुसरीकडे मात्र काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीदेखील दिल्लीत काँग्रेस नेत्यांची बैठक आयोजित केली. त्यामुळे आता राज्यासह देशाच्या राजकारणात आणखीन कोणती नवी घडामोड होणार याकडेच सर्वांचे लक्ष लागलय. सोनिया गांधींनी सरचिटणीस तसेच राज्याचे प्रदेशाध्यक्ष आई राज्य प्रभारी यांची ही बैठक बोलावलेली आहे.येत्या (२४जून) ला ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित करण्यात आली आहे.

तसेच पंजाब आणि राजस्थान मधील काँग्रेस पक्षातले आपापसातले वाद आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील सध्याच्या घडामोडींमुळे या बैठकीला आणखीनच महत्त्व प्राप्त झालय.

महाराष्ट्रात काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर टीका केलीये शरद पवार यांचा दिल्ली दौरा देखील आता महत्त्वपूर्ण विषय मानला जातोय. म्हणून सोनिया गांधी यांच्या बैठकीकडे देशातील प्रमुख नेत्यांचे लक्ष लागले.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती

उत्तर प्रदेशमध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं हालचाली सुरु केल्या आहे. आणि या निवडणुकीचा भार आता काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आपल्या खांद्यावर घेतला आहे. स्वतः प्रियंका गांधींनी उत्तर प्रदेशमधील ५० नेत्यांना फोन करुन निवडणूक लढण्यासाठी हिरवा कंदिल दिला आहे. इतंकच नाही तर काँग्रेसनं येत्या ऑगस्टपर्यंत राज्यातील २०० हून अधिक जागांसाठी उमेदवारांची यादी फायनल करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. त्याअंतर्गत प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू यांनी झोननिहाय बैठक घेऊन उमेदवारांच्या निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे.

तुमचं तिकीट कन्फर्म

प्रियंका गांधी यांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात यूपीच्या सुमारे ५० नेत्यांना फोन करुन २०२२ च्या निवडणुका लढण्याची तयारी करा असं सांगितलं. प्रियंका यांनी फोनवर स्पष्ट सांगितलं की, निवडणुकीची तयारी करा, तुमचं तिकीट कन्फर्म आहे. यासह २०१७ मध्ये विजयी झालेल्या ७ पैकी ५ आमदारांनाही निवडणूक लढवण्यास हिरवा कंदिल दिला. त्यांनी या सर्व नेत्यांना आपल्या क्षेत्रात पूर्ण लक्ष केंद्रित करणं आणि शक्य तितक्या लोकांना मदत करण्यास सांगितले आहे. याशिवाय सर्वांच्या आनंदात आणि दु:खामध्ये सामील व्हा आणि सरकारच्या वाईट धोरणांबद्दल त्यांना सांगा, असंही त्यांनी नेत्यांना म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गॅसदरवाढीवरून राज्यसभेत गदारोळ

News Desk

आम्हाला भारतासोबत शांततापूर्ण संबंध ठेवायचे आहेत | इम्रान खान

Gauri Tilekar

छत्तीसगडमधील नक्षलवादी हल्ल्यात दूरदर्शनच्या कॅमेरामनचा मृत्यू

swarit