HW News Marathi
Covid-19

“सोनू सूदवर आयकर धाडी म्हणजे रडीचा डाव” – शिवसेना

मुंबई | ‘महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या मागे खोटे आरोप लावणे, राज्यपालांनी वरच्या दबावामुळं १२ आमदारांची नियुक्ती रोखणे, सोनू सूदसारख्यांवर आयकर धाडी घालणे हे कोत्या मनाचे लक्षण आहे, हे रडीचे डाव आहेत. त्या डावांचा पोरखेळ एकदिवस उलटा पडल्याशिवाय राहणार नाही,’ अशा शब्दांत शिवसेनेनं भाजपला फटकारलं आहे. बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याच्याशी संबंधित सहा ठिकाणी प्राप्तिकर विभागाने बुधवारी छापे टाकल्याची माहिती समोर आली आहे. सोनू सूदच्या घरी व ऑफिसमध्ये छापे टाकल्याने चर्चांना उधाण आलं आहे. यावरुन महाविकास आघाडीने भाजपवर जोरदार टीका केली आहे. तर, शिवसेनेनंही आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे.

दिल्लीच्या केजरीवाल सरकारच्या शैक्षणिक कार्यक्रमाचे ‘ब्रॅण्ड ऍम्बेसेडर’ म्हणून सामाजिक कार्य

करोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी सोनू सूद भलत्याच झोतात आला. गोरगरीबांचा मसीहा, मुंबईतून परराज्यांत जाणारे मजूर वगैरे लोकांचा आधारस्तंभ म्हणून त्याचा बोलबाला सुरु झाला. बसेस, ट्रेन्स, विमाने बुक करून सोनू सूद मुंबईत अडकलेल्या लोकांना परराज्यांतील त्यांच्या घरी पाठवीत होता. तेव्हा ‘जे सोनूला जमते ते महाविकास आघाडी सरकारला का जमत नाही?’ असले पाणचट प्रश्न विचारण्यात आले. दुसरे म्हणजे सोनू सूदला खांद्यावर घेऊन मिरवणाऱ्यांत भाजप पुढे होता. सोनू सूद हा आपलाच माणूस असल्याचे त्यांच्याकडून सतत बिंबविण्यात येत होते, पण या सोनुने दिल्लीच्या केजरीवाल सरकारच्या शैक्षणिक कार्यक्रमाचे ‘ब्रॅण्ड ऍम्बेसेडर’ म्हणून सामाजिक कार्य करायचे ठरवताच त्यांच्यावर आयकर विभागाच्या धाडी पडल्या आहेत,’ अशी शंका शिवसेनेनं व्यक्त केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काही लोकांना हौस असते आंदोलन करण्याची ! अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा

News Desk

मी बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो कि … ! वाझेंच्या आरोपांवर अनिल परबांचे स्पष्टीकरण

News Desk

…तेव्हा भाजपचे अतुल भातखळकर माझ्याकडे तिकीट मागायला आले होते ! राज ठाकरेंचा गौप्यस्फोट

News Desk