HW News Marathi
महाराष्ट्र

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात योग्य कारवाई न केल्याचा समीन वानखेडेंवर ठपका, केंद्रीय गृहमंत्रालायने दिले चौकशीचे आदेश

मुंबई | कॉर्डिलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्रालायने दिल्याची माहिती एएनआय वृत्त संस्थेने दिली आहे. या प्रकरणी वानखेडेंनी योग्य तपास न केल्याचा ठपका ठेवला आहे. या प्रकरणात अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान एनसीबीच्या एसआयटी टीमने क्लिनचीट मिळाली आहे. ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने आज (२७ मे) मुंबई सत्र न्यायालयात १० खंडाचे ६००० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. ड्रग्ज प्रकणात एनसीबीने एकून सहा जणांना क्लिनचीट दिली असून या सहा जणांमध्ये आर्यन खानचे नाव आहे. एनसीबीच्या टीमने मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट या दोघांना मात्र क्लिनचीट दिलेली नाही.

दरम्यान, वानखेडेंनी आर्यन खानवर केलेली कारवाई ही बोगस असल्याचा आरोप कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी केली होती. केंद्रीय गृहमंत्रालायने दिलेल्या आदेशानंतर मलिकांनी केलेल्या आरोपावर शिक्कामोर्ताब झालेला आहे. क्रूझ प्रकरणी वानखेडेंनी आर्यन खान, अरबाज मर्चेंट, मुनमुन धमेचा, विक्रांत छोकर, मोहक जैसवाल,इशमित सिंह, गोमती चोप्रा, नूपुर सतीजा, अब्दुल कादर शेख, श्रेयश नायर, मनीष राजगरिया, अविन साहू, समीर सिंघल, मानव सिंघल, भास्कर अरोरा, गोपाल जी आनंद, अचीत कुमार, चीनेडु इग्वे, शिवराज हरिजन, ओकोरो उजेओमा या सर्वांना या प्रकरणात अटक करण्यात आली होती. यातील ६ जणांना एनसीबीच्या एसआयटी टीमने क्लिनचीट दिली आहे. आर्यन खान, अविन शुक्ला, गोपाल आनंद, समीर साईघन, भास्कर अरोरा,  आणि मानव सिंघल या सहा जणांना क्लिनचीट दिली आहे. 

नेमके काय आहे प्रकरण

कॉर्डिलिया क्रूझमध्ये २ ऑक्टोबरला एनसीबीने छापा टाकला होता. यात एनसीबीला १३ ग्रॅम कोकेन, ५ ग्रॅम मेफेड्रोन, २१ ग्रॅम चरस, एमडीएमच्या २२ गोळ्या आणि दीड लाखांपर्यंत रोकड जप्त केली होती. यात बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खानकडे आम्ली पदार्थ सापडल्यामुळे एनसीबीने त्यांना अटक केले होते. यानंतर आर्यनला मुंबईच्या आर्थर जेलमध्ये होता. यानंतर आर्यनला जामीन मिळवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज केला होता. पंरतु, न्यायालयाने दोन वेळा आर्यनचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. या प्रकरणी आर्यन खान हा मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. गेल्या २६ दिवसांनंतर आर्यनला २८ ऑक्टोबरला हायकोर्टाकडून जामीन मंजूर मिळाला आला. आर्यनला ३० ऑक्टोबरला तुरुंगातून सुटका झाली. या प्रकरणात आर्यन खानसह मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट अटक केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“या सरकारची हंडी फोडण्याची वेळ आलीये”, दहीहंडी निर्णयावरून अतुल भातखळकर आक्रमक

News Desk

अमिताभ गुप्ता यांची पुणे पोलिस आयुक्तपदी नियुक्ती

News Desk

तेजस ठाकरे राजकारणात येणार ? वरूण सरदेसाई म्हणतात…

News Desk