HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेने अंतर्गत काम करण्यास पृथ्वीराज चव्हाण-अजित पवारांचा नकार ?

मुंबई | राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापनेवर जवळपास शिक्कामोर्तब झाला आहे. यासाठी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांची आज (२२ नोव्हेंबर) संयुक्त बैठक मुंबईतील नहेरू सेंटरमध्ये सुरू झाली आहे. बैठकीत शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तिन्ही पक्षातील जेष्ठ नेते सहभागी झाले असून त्यांच्या पक्षातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदासाठी उमेदवारींची अंतिम नावे देण्यात येणार आहे.

तसेच महाविकासआघाडीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदासाठी अनेक नावांवर चर्चा रंगू लागल्या आहेत. पुढली ५ वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असणार अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाकडून पाच वर्षासाठी दोन उपमुख्यमंत्री पदाची नावे असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिसवसेनेकडून मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी व्हावे, अशी इच्छा शिवसैनिकांनी आज आमदारांच्या झालेल्या बैठकीत व्यक्त केली आहे.

तर काँग्रेसकडून उपमुख्यमंत्रिपदासाठी पक्षश्रेष्ठींनी काँग्रेस नेता पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव देण्यात आले होते. मात्र, चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री पद भूषविले आहे. त्यामुळे चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री पदासाठी नकार दिल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. तर चव्हाण यांनी महाविकासआघाडीच्या सरकारच्या कार्यकाळात महसूल खात्यांची मागणी केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. चव्हाणांनी उपमुख्यमंत्रिपदी विराजमान होण्यास नकार दिल्यानंतर पक्षांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नावा पुढे केले असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून अडीच वर्षाच्या उपमुख्यमंत्री पदासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या नावावर पक्षातील सर्व नेत्यांनी पसंती दिली होती. मात्र, अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदासावरून स्वत:चे नाव बाजुला केल्याची माहिती एच. डब्ल्यू. मराठीच्या हातील लागली आहे. कारण अजित पवार हे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासोबत काम करण्यास इच्छुक नसल्याची माहिती मिळाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सचिन आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील?” स्वाभिमानीच्या रणजित बागलचा पोस्टरद्वारे सवाल!

News Desk

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवजन्म सोहळा सुरू

News Desk

मराठा मोर्चाची अमेरिकेत दखल

News Desk