HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

पंकजा मुंडेंकडून सीमोल्लंघनाचे संकेत, कार्यकर्ते प्रचंड उत्साहात

मुंबई | विजयादशमीच्या निमित्ताने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी रविवारी (२५ ऑक्टोबर) ‘आपला दसरा’ या कार्यक्रमामार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही भगवान भक्तीगडावर आपल्या समर्थकांना संबोधित केले. पंकजा मुंडे यावेळी नेमक्या काय बोलणार ? याकडे सर्वांचेच लक्ष होते. दरम्यान, पंकजांनी केलेल्या या भाषणात अनेक सूचक इशारे आहेत. याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. हे महत्त्वाचे मुद्दे कोणते ? हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

यंदाच्या विधानसभेतील दारुण पराभवानंतर पंकजा मुंडे पक्षावर प्रचंड नाराज होत्या. पुढे राज्यसभेची उमेदवारी असो वा राज्याची कार्यकारणी पंकजांना वारंवार डावलण्यात आल्याने पंकजांची नाराजी वाढल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगल्या. मात्र, एकनाथ खडसेंप्रमाणे कधीही पंकजांनी आपली नाराजी उघडपणे जाहीर केली नाही. आता पक्षाच्या केंद्रीय कार्यकारणीत मोठी जबाबदारी मिळाल्याने पंकजांची नाराजी दूर झाल्याचे म्हटलं जातं असलं तरीही खरंच असं आहे का ? हे जाणून घेणे महत्त्वाचं ठरतं. पंकजांचं यंदाचं दसरा मेळाव्याचं भाषण म्हणून सूचक ठरतं.

आपल्या या भाषणात पंकजा मुंडेंनी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आपले मोठे भाऊ असा उल्लेख करत त्यांचे कौतुक केलंय. तर दुसरीकडे मात्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा साधा उल्लेखही केलेला नाही. तसेच, एकीकडे पंकजांनी राष्ट्रवादी पक्षाचा उल्लेख करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचे आभार मानले आहेत. मात्र, राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका करत त्यांचं नावही घेणं टाळलेलं आहे.

मी आमदार नसले तरीही मीच आमदार !

“मी आमदार नसले तरी पार्थडी, जिंतूर आणि केजची आमदार मीच आहे”, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. त्याचप्रमाणे, भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी मिळालेल्या डॉ. भागवत कराड यांच्यासोबतही मीच आहे असेही पंकजानी यावेळी म्हटलं. आता हे सांगत पंकजां यांनी हे दाखवून देण्याचा प्रयत्न केलाय कि, आपल्याला पक्षाकडून कोणतेही पद मिळालं नसलं किंवा आपण निवडणुकीत जरी पराभूत झालो असलो तरीही जिल्ह्यावरची आपली पकड तिळमात्रही कमी झालेली नाही.

 

मी आहे तिथेच आहे !

 

केंद्रात जबाबदारी मिळालेली असली तरीही “मी आहे तिथेच आहे” असे म्हणत आपलं महाराष्ट्रावर पूर्णपणे लक्ष आहे हे देखील पंकजा मुंडे यांनी सूचित केलंय. “पंकजा मुंडे संपत आहेत” अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असताना आपल्याच बालेकिल्ल्यातून पंकजांनी आपल्या नव्या राजकीय दिशा आणि मार्ग लोकांपुढे मांडत आपली ताकद दाखवण्याचा हा प्रयत्न केलेला दिसतो.

सर्वकाही सोडून लोकांच्या सेवेत रुजू होण्याचे आश्वासन

कोरोनासारख्या बिकट स्थितीत गेले कित्येक महिने पंकजा आपल्या स्वतः च्या जिल्ह्यात नव्हत्या. सद्यस्थितीत त्यांच्याकडे कोणतंही पद नाही. त्यामुळे, अशा स्थितीत आपण जिल्ह्यात का नव्हतो ? ह्याची कारणं सांगत पंकजांनी आता आपण सर्वकाही सोडून आता लोकांच्याच सेवेत रुजू होणार असल्याचे आश्वासन देत लोकांच्या मनातील आपल्याबद्दलचा विश्वास वाढविण्याचा प्रयत्न करत उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

पंकजा यावेळी म्हणाल्या की, “माझा जीव गेला तरी चालेल. पण मी आता राज्यभर फिरणार. माझा १९ वर्षांचा मुलगा आहे. आता मला घरात बाकी करण्यासारखं काही नाही. मी माझं आयुष्य तुमच्यासाठी वाहून देतेय. योगायोगाने आज मी पांढरी साडी नेसून आले आहे.”

लवकरच आपल्याला शिवतीर्थावर मेळावा भरवायचा आहे ! सीमोल्लंघनाचे संकेत

यंदा आपल्याला आरोग्याच्या कारणास्तव हवा तसा दसरा मेळावा करता आला नाही. मात्र, यापुढं यानंतर आपण गर्दीचेही उच्चांक मोडू. आपल्याला आता लवकरच शिवतीर्थावरही मेळावा घ्यायचा आहे, असे सूचक विधान यावेळी पंकजा मुंडेंनी केले. विशेष म्हणजे पंकजा मुंडेंनी नुसता शिवतीर्थाचा उल्लेख करताच प्रचंड प्रमाणात कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि उत्साह पाहायला मिळाला. त्याचप्रमाणे पंकजांनी हे विधान अत्यंत विचारपूर्वक केल्याचेही दिसून आले.

आता पंकजा मुंडेंनी आपल्या भाषणात दिलेल्या या संकेतांनंतर त्यांची पुढची राजकीय वाटचाल काय असणार ? हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे

Related posts

सरकार कधी स्थापन होणार हे  भाजप-शिवसेनेलाच विचारा !

News Desk

पुन्हा एकदा चंद्रशेखर रावच तेलंगणाचे मुख्यमंत्री

News Desk

महान लढवय्यास आमची नतमस्तक होऊन मानवंदना!

News Desk