HW News Marathi
महाराष्ट्र

पंतप्रधानांच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्घाटन, प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांशी साधला संवाद

पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे दोऱ्यादरम्यान पंतप्रधान यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले. त्याचबरोबर पंतप्रधानांनी पुणे मेट्रेच्या गरवारे महाविद्यालच्या जवळी मार्गाचे उद्घाटन केले आहे. मेट्रोचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधानांनी स्वत: तिकीट काढून मेट्रोमधून प्रवास केला. गरवारे मेट्रो स्टेशन ते आनंदनगरपर्यंत मेट्रोने प्रवास केला. पंतप्रधानांनी मेट्रो प्रवासादरम्यान शालेय विद्यार्थ्यांशी संवाद सादला. 

दरम्यान, पंतप्रधानांनी प्रवासामध्ये विद्यार्थ्यांना तुम्ही कोणत्या शाळेत शिकता, आमची सर्वांची नावे विचारली आणि तुम्हाला भविष्यात कोण व्हायचे आहे?, एका विद्यार्थ्याला पंतप्रधानांनी मेट्रोतून प्रवास करताना कसे वाटले? अशी विचारपूस केल्याची विद्यार्थ्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. पंतप्रधानांनी अनावरण केलेल्या महाराजांचा पुतळा १८५० किलोग्रॅम गन मेटलचा बनवलेला असून त्याची उंची सुमारे ९.५ फूट आहे. 

तसेच पुणे मेट्रोचे उदघाटन केल्यानंतर पंतप्रधानांनी पीएमपीएलच्या १०० ई-बस आणि ई-बस डेपोचे लोकार्पण केले आहे. काँग्रेसमुळे महाराष्ट्रात कोरोना वाढल्याचे वादग्रस्त विधान पंतप्रधानांनी संसदेत केले होते. या पार्श्वभूमीवर पुण्यात काँग्रेसचे कार्यकर्ते काळे झेंडे दाखवून आंदोलन सुरू आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पेट्रोल दरवाढीवर कॉंग्रेसचं पुण्यात आंदोलन, थेट पेट्रोल पंपावर नेली घोडागाडी

News Desk

खडसेंची ईडीची समन्स् रद्द करण्यासाठी न्यायालयाकडे मागणी

News Desk

शरद पवार म्हणाले दौरे टाळा, मात्र नातवाचा कोकण दौरा सुरु!

News Desk