HW News Marathi
Covid-19

भारतात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३ हजार ९७० नवीन रुग्ण,एकूण संख्या ८५ हजार ९४० वर

नवी दिल्ली | भारतात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३ हजार ९७० कोरोना रुग्णांची नोंद झाली असून १०३ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाच्या रुग्णांची संख्या ८५ हजार ९४० वर पोहोचली आहे, तर आतापर्यंत एकूण २ हजार ७५२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आज (१६ मे) दिली आहे.

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या १ मेपर्यंत ३५०४३ होती. तर ११४७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तर देशात १६ मेपर्यंत कोरोना रुग्णांचा आकडा ८५ हजार ९४० वर पोहोचला आहे. देशात गेल्या १५ दिवसांमध्ये ४६, ९२७ रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. देशातील सध्याच्या कोरोना बाधितांच्या संख्येपैकी ५७.२४ टक्के रुग्ण मागील पंधरा दिवसांत आढळून आले आहेत.

देशात महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्णांची संख्या आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २९ हजार १०० झाली आहे. काल (१५ मे) १५७६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ५०५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ६५६४ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २१ हजार ४६७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल सांगितले.

कोरोनामुळे कोणत्या राज्यात किती मृत्यू

  • महाराष्ट्रात – १०६८
  • गुजरात – ६०६
  • मध्यप्रदेश – २३९
  • पश्चिम बंगाल – २२५
  • राजस्थान – १२५
  • दिल्ली – १२३
  • उत्तर प्रदेश – ९५
  • आंध्रप्रदेश – ४८
  • तामिळनाडू – ७१
  • तेलंगणा – ३४
  • कर्नाटक – ३६
  • पंजाब – ३२
  • जम्मू-काश्मीर – ११
  • हरियाणा – ११
  • बिहार – ७
  • केरळ – ४
  • झारखंड – ३
  • ओडिशा – ३
  • चंदिगढ – ३
  • हिमाचल प्रदेश – ३
  • आसाम – २
  • मेघालय – १
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#LockDown4 : लॉकडाऊनमध्ये काय सुरू-काय बंद, तर कोणत्या गोष्टींना मिळणार परवानगी

News Desk

…म्हणून भाजप आमदार पवारांना भेटतात ! चंद्रकांत पाटलांनी सांगितले कारण

News Desk

तासगावच्या द्राक्ष उत्पादकांसाठी जयंत पाटील यांचा अनोखा पॅटर्न

News Desk