HW News Marathi
Covid-19

जगात कोरोना चाचणी करण्याच्या संख्येत अमेरिकेनंतर भारताचा क्रमांक अव्वल !

वॉशिंग्टन | संपूर्ण जगात कोरोनाने हाहाकार घातला आहे. जगभरात दीड कोटींच्या पुढे गेली आहे. दिवसेंदिवस वातावरण आणखी चिंतेचे होत चालले आहे. जगात सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत आहेत. आता पर्यंत अमेरिकेत ४.२ कोटी कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर सर्वाधिक नमुन्याची चाचणी करण्याच्या यादीत अमेरिकेनंतर भारताचा क्रमांक लागत आहे. व्हाईट हाऊसने यासंबंधी माहिती दिली आहे. भारतात आतापर्यंत १.२ कोटी नमुन्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

जगात कोरोना रुग्णांच्या यादीत भारताचा क्रमांक तिसरा आहे आणि सर्वाधिक कोरोना चाचणी करणाऱ्या देशांमध्ये देखील भारताचा अमेरिकेनंतर क्रमांक लागतो. त्यामुळे एकीकडे जरी रुग्ण संख्या वाढत असली तरी चाचण्या अधिक होत आहेत ही नक्कीच दिलासादायक बाब आहे. अमेरिकेत ४.२ कोटी नमुन्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून भारतात ही संख्या १.२ कोटी इतकी आहे. तसेच, देशात कोरोनातून बरे होणाऱ्यांची टक्केवारी ६३.२४% इतकी झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज ४३१ नवीन रुग्णांचे निदान, एकूण रुग्ण संख्या ५६४९ वर

News Desk

बीडमध्ये कोरोनाचा पहिला बळी, ६५ वर्षिय महिलेचा मृत्यू

News Desk

चिंताजनक! दिवसभरात राज्यात ३९,५४४ नवे कोरोनाबाधित

News Desk