मुंबई | राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गामुळे यंदा १०वी, १२वीच्या परीक्षा घेण्याचं आव्हान सरकारसमोर उभं राहिलं आहे. त्यामुळे यंदा परीक्षा कशापद्धतीने होणार? याबद्दल पालकांच्या मनात शंका उपस्थित होत होत्या. अखेर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पालक व विद्यार्थ्यांच्या मनातील शंकांचं निरसन करत १०वी व १२वी परीक्षेसंदर्भात घेण्यात आलेला निर्णय व अन्य महत्वाच्या सूचनांची माहिती आज (२० मार्च)) पत्रकारपरिषदेत दिली आहे.
त्यानुसार, इयत्ता १०वी व १२वीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याची त्यांनी जाहीर केलं आहे. तसेच, लेखी परीक्षेसाठी अधिकचा ३० मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे. तसेच, दहावी, बारावीची प्रॅक्टिकल परीक्षा ही लेखी परीक्षेनंतर होणार आहे. विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी साडेतीन तासांचा वेळ देण्यात आलेला आहे. अशी देखील त्यांनी माहिती दिली आहे.
लेखी परीक्षा शाळेतच होणारकोरोनामुळे हे लेखी परीक्षा ही तुम्ही शिक्षण घेत असलेल्या शाळा किंवा कॉलेजमध्ये परीक्षा घेतली जाईल. जर वर्ग कमी असल्यास इतर शाळेत बैठक व्यवस्था केली जाईल, असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत. तसेच यंदा ८० गुणांच्या परीक्षेसाठी ३० मिनिटं वाढीव वेळ दिला जाणार आहे. तर ४० आणि ५० गुणांच्या परीक्षेसाठी १५ मिनिटं वाढवून दिली जाणार आहे. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रत्येक तासाला २० मिनिटं वाढवून देणार आहे.
Hats off to our students who have braved this tough academic year. To help them, here are some concessions and guidelines for the final exams. For FAQs, referhttps://t.co/KX9sqYrmnj pic.twitter.com/BX0873EFVM
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) March 20, 2021
प्रॅक्टिक्ल परीक्षा यंदा असाईनमेंट पद्धतीने
दहावीच्या प्रॅक्टिक्ल परीक्षा यंदा असाईनमेंट पद्धतीने घेतल्या जाणार आहे. विशेष म्हणजे हे असाईनमेंट लेखी परीक्षा संपल्यानंतर शाळेत गृहपाठ पद्धतीने द्यायचे आहेत.१०वी परीक्षा २९एप्रिल २०२१ ते २० मे २०२१ या कालावधीत होणारदरम्यान काही दिवसांपूर्वी बोर्डाकडून दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
यानुसार माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र म्हणजे इयत्ता १०वीची परीक्षा २९ एप्रिल २०२१ ते २० मे २०२१ या कालावधीत होणार आहे. तर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच १२वीची परीक्षा २३ एप्रिल २०२१ ते २१ मे २०२१ या कालावधीत होणार आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरही १६ फेब्रुवारी २०२१ पासून वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.