HW News Marathi
महाराष्ट्र

मोठी बातमी! राज्यातील १०वीची परीक्षा रद्द करण्याचा ठाकरे सरकारचा निर्णय

मुंबई | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्रात पुन्हा मागच्या वर्षीसारखा कडक लॉकडाऊन लागू शकण्याचे संकेत ठाकरे सरकारमधील नेत्यांनी दिले आहेत. आज (२० एप्रिल) महाराष्ट्रातील कोरोनाच्या संदर्भात राज्य मंत्री मंडळाची एक महत्वाची बैठक पार पडली. यावेळी अनेक महत्वाचे निर्णय सहमतीने घेण्यात आले आहेत. त्यातील अत्यंत महत्वाचा निर्णय तो म्हणजे राज्यातील १० वीच्या परीक्षेचा.राज्यातील वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहता विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विचार करत १० वीची परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. कोरोनाच्या बिघडत्या परिस्थितीमुळे राज्य सरकारने १०वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थी, शिक्षक यांचे आरोग्य महत्वाचे असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे ट्विट वर्षा गायकवाड यांनी केले आहे. तसेच, केंद्र सरकारने ICSE, CBSE बोर्डाच्या १०वीच्या परीक्षा आधीच रद्द केल्या आहेत. मात्र, १२वीच्या परीक्षा होणार असून तारीख जाहीर करणार आहेत. महाराष्ट्रातही १२वीच्या परीक्षा मे अखेरपर्यंत होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मागस जातींना प्रवर्ग लागू करावा- लक्ष्मण ढोबळे यांची मागणी

News Desk

राज्यात काहीही नवे घडले की माझ्याच नावाची चर्चा !

News Desk

संजय राऊत आणि नवाब मालिकांना शाहरुखने भाड्याने घेतलंय!, नितेश राणेंची बोचरी टीका

News Desk