HW News Marathi
महाराष्ट्र

एसटी महामंडळाचा ३० टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव

मुंबई : इंधन दरवाढीबरोबरच कर्मचाऱ्यांची वेतनवाढ आणि महामार्गावरील टोल दरात झालेल्या वाढीमुळे एसटी महामंडळावर मोठा आर्थिक बोजा पडत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने ३० टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव तयार करून गुरुवारी परिवहन मंत्री आणि अध्यक्ष दिवाकर रावते यांच्याकडे पाठवला आहे.

तोट्या असलेल्या एसटी महामंडळा इंधन दर वाढीची झळ बसू लागली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतन करारही अडचणीत आला असून यावर तोडगा काढण्यासाठी महामंडळाला ३० टक्के दरवाढ करण्याचा या प्रस्तावाला सरकारने मान्यता दिली. तर मुंबई ते पुणे मार्गावरील शिवनेरी बसच्या ४५६ रुपये असलेल्या भाडे दरात १३४ रुपयापर्यंत वाढ होऊ शकते.

वातानुकूलित बसच्या भाड्यात वाढ झाली तर प्रवाशांच्या खिशाला कात्री लागेल. परंतु यावर भाडेवाढीवर अद्याप निर्णय झाला नाही. सध्या दादर ते पुणे अशा प्रवासासाठी ४५६ रुपये मोजावे लागतात. या प्रस्तावाला मान्यता मिळाली तर हा प्रवास थेट ५९० रुपयापर्यंत जाईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आव्हाडांच्या ‘त्या’ वादग्रस्त विधानानंतर पडळकर आक्रमक; महाविकासआघाडी सरकारवरही हल्लाबोल

Aprna

बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाला गती द्यावी! – मुख्यमंत्री

Aprna

पालघरमध्ये भूकंपाचे धक्के, भिंत कोसळून १ महिलेचा मृत्यू

News Desk