HW Marathi
महाराष्ट्र

एसटी परीक्षेचा निकाल जाहीर, ७४२ महिला उत्तीर्ण

मुंबई । एसटी महामंडळाच्या वतीने चालक तथा वाहक पदासाठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेचा निकाल लागला आहे. या परीक्षेत बसलेल्या ३५ हजार ४६३ उमेदवारांपैकी ३० हजार ६८ उमेदवारच उत्तीर्ण झाले आहे. या पराक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमध्ये तब्बल ७४२ महिलांचा समावेश आहे. सदर निकाल महामंडळाच्या www.msrtc.gov.in या अधिकृत संकेत स्थळावर पाहू शकता.


उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची प्रमाणपत्र  व शारिरीक उंची  व अन्य अहर्तासंबंधीची तपासणी झाल्यानंतर १०० गुणांची संगणकीकृत वाहन चालन चाचणी होणार आहे .या चाचणीचे गुण व लेखी परीक्षेचे गुण एकत्रित करुन अंतिम निकाल जाहीर करण्यात येईल . तसेच ज्या महिला उमेदवार उत्तीर्ण झाल्या आहेत , त्यांची केवळ शारीरिक उंची व अन्य   अहर्तासंबंधीच्या प्रमाणपत्राची पडताळणी होऊन त्यांना एसटीतर्फे एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी निवडले जाणार आहे.
 दुष्काळग्रस्त भागीतल १२ जिल्ह्यांसह एकूण २१ जिल्ह्यांमध्ये एसटी महामंडळाच्या वतीने ८ हजार ०२२ चालक आणि वाहक पदाच्या भरतीसाठी राज्यातून जवळपास ४२ हजार अर्ज आले होते. त्यामध्ये महिला उमेदवारांचे 932 अर्ज प्राप्त झाले होते. एसटी महामंडळाने आदिवासी उमेदवारांसाठी राबविलेल्या विशेष प्रचार मोहिमेमुळे अनुसूचित जमातीच्या ६८५ पदांसाठी २,४०६ अर्ज दाखल झाले होते.

Related posts

बेछूट आरोपांपेक्षा आत्मचिंतन करा, अशोक चव्हाणांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला  

News Desk

सिमेंट रस्त्यावर पुन्हा रस्ता

News Desk

शेतकरी सन्मान योजनेचा बोजवारा, शेतकऱ्यांच्या खात्यावर आलेले पैसे गेले परत

News Desk