HW News Marathi
महाराष्ट्र

एसटी परीक्षेचा निकाल जाहीर, ७४२ महिला उत्तीर्ण

मुंबई । एसटी महामंडळाच्या वतीने चालक तथा वाहक पदासाठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेचा निकाल लागला आहे. या परीक्षेत बसलेल्या ३५ हजार ४६३ उमेदवारांपैकी ३० हजार ६८ उमेदवारच उत्तीर्ण झाले आहे. या पराक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमध्ये तब्बल ७४२ महिलांचा समावेश आहे. सदर निकाल महामंडळाच्या www.msrtc.gov.in या अधिकृत संकेत स्थळावर पाहू शकता.

उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची प्रमाणपत्र व शारिरीक उंची व अन्य अहर्तासंबंधीची तपासणी झाल्यानंतर १०० गुणांची संगणकीकृत वाहन चालन चाचणी होणार आहे .या चाचणीचे गुण व लेखी परीक्षेचे गुण एकत्रित करुन अंतिम निकाल जाहीर करण्यात येईल . तसेच ज्या महिला उमेदवार उत्तीर्ण झाल्या आहेत , त्यांची केवळ शारीरिक उंची व अन्य अहर्तासंबंधीच्या प्रमाणपत्राची पडताळणी होऊन त्यांना एसटीतर्फे एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी निवडले जाणार आहे.
दुष्काळग्रस्त भागीतल १२ जिल्ह्यांसह एकूण २१ जिल्ह्यांमध्ये एसटी महामंडळाच्या वतीने ८ हजार ०२२ चालक आणि वाहक पदाच्या भरतीसाठी राज्यातून जवळपास ४२ हजार अर्ज आले होते. त्यामध्ये महिला उमेदवारांचे 932 अर्ज प्राप्त झाले होते. एसटी महामंडळाने आदिवासी उमेदवारांसाठी राबविलेल्या विशेष प्रचार मोहिमेमुळे अनुसूचित जमातीच्या ६८५ पदांसाठी २,४०६ अर्ज दाखल झाले होते.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरे याचं आव्हान स्विकारायचं सोमय्यापुढे आव्हान

News Desk

राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्यामागचे चित्रा वाघ यांचे ‘हे’ कारण

News Desk

आमचा दसरा कडवट झाला तर तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही – राजू शेट्टीं

News Desk