HW News Marathi
महाराष्ट्र

एसटीची संप अटळ, एसटी संघटनांची मुख्यमंत्र्यां बरोबरची चर्चा फिसकटली

मुंबई – सातवा वेतन आयोगाची अंमलबजावणी आणि हंगामी पगार वाढ या मागणी वरून मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांच्या बरोबर झालेली चर्चा फिस्कटली आहे. त्यामुळे एसटी कामगार संघटनेने पुकारलेला संप अटळ असल्याचे संघटनेचे अध्यक्ष हनुमंत ताटे यांनी सांगितले आहे. सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या बाबत आडमुठे पणाची भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती की राज्य सरकारी कर्मचाऱ्यां सोबत एसटी कर्मचाऱ्यांनीही सातवा वेतन आयोग लागू करावा. मात्र मुख्यमंत्र्यांनी या बाबत काही ही शब्द देता येणार नाही असे स्पष्ट केले. तसेच आता सध्या हंगामी वेतन वाढ देवून जेंव्हा सातवा वेतन आयोग लागू होईल त्यावेळी हंगामी वेतनावाढ हटवावी ही मागणीही मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावली अशी माहिती ताटे यांनी दिली. या बाबत दोन तास चर्चा होवूनही त्यातून कोणताही तोडगा निघाला नसल्याचंही त्यांनी सांगितले. त्यामुळे उद्या घोषीत करण्यात आलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप अटळ असचे ते म्हणाले. या संपात १ लाखाच्या वर एसटी कर्मचारी सहभागी होतील असा दावा त्यांनी केला. एेन दिवाळी हा संप पूकारल्याने प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मुंबईतील निवासस्थान राजगृहावर काल झालेल्या तोडफोडीचे राजकीय नेत्यांनी नोंदवला निषेध

News Desk

अजित पवार यांनी तिसऱ्यांदा घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

News Desk

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज होणार मतदान

Aprna