HW News Marathi
महाराष्ट्र

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज होणार मतदान

मुंबई। कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. कोल्हापूरच्या निवडणुकीमध्ये ३५७ मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. तसेच कोल्हापुरात ७ मतदारसंघ हे संवेदनशील असून याठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

कोल्हापुरच्या पोटनिवडणुकीत महाविकासआघाडीमधून काँग्रेसच्या जयश्री पाटील या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर भाजपमधून सत्यजित कदम निवडणूक लढवित आहेत. या निवडणुकीत दोन्ही बाजूंनी त्यांची प्रतिष्ठा पणाला लावली आहे. रविवारी या निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस होता. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या उमेदवारासाठी प्रचार केला आहे.

भाजपवर पैसे वाटण्याचा काँग्रेसचा आरोप

कोल्हापूरच्या मंगळवार पेठेतील पद्मावती परिसरातील भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविका सुनंदा मोहिते यांच्या कार्यालयातून रोख पैशाची पाकीटे, मतदारांची यादी व भाजपाची प्रचार पत्रके मिळाली आहेत. दसरा चौकातही पैसे वाटपाचा प्रयत्न उघड झाला आहे, तक्रार काँग्रेसने पोलिसात केली असून पोलिसांनी यासंदर्भात काही लोकांना ताब्यात घेतलेले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई पोलीस दलात मोठे बदल, गुन्हे शाखेच्या तब्बल ६५ अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या

News Desk

“राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन डोस पूर्ण करावेत” अजित पवार

News Desk

ST कर्मचाऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलू नये यासाठी अनिल परबांचे आवाहन

News Desk