HW News Marathi
Covid-19

उद्यापासून राज्यात रेड व कंटेंनमेंट झोन वगळून ‘जिल्ह्यांतर्गत’ एसटी सेवा सुरु

मुंबई | कोरोनाचा फैलाव रोखण्याच्या दृष्टीने राज्य शासनने दिलेल्या निर्देशानुसार, राज्यातील रेड झोन आणि कंटेंनमेंट झोन वगळता इतर सर्व विभागांमध्ये काही अटीशर्तींसह उद्या म्हणजे शुक्रवारपासून (२२ मे) जिल्ह्यांतर्गत एसटी बससेवा सुरु होणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री अॅड.अनिल परब यांनी दिली आहे. अनिल परब पुढे म्हणाले कि, “२३ मार्चपासून गेले २ महिने राज्यात मुंबई व उपनगरात अत्यावश्यक सेवा वगळता एसटी बस सेवा संपूर्ण बंद आहे. परंतु, लॉकडाऊनच्या ४ थ्या टप्प्यात राज्य शासनाने रेड झोन व कंटेंनमेंट झोन वगळता काही अटीशर्तींसह एसटी महामंडळाला केवळ जिल्ह्या-अंतर्गत एसटी बस सेवा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. “

जिल्ह्यातील निवडक मार्गावर उद्यापासून (२२ मे) एसटी बस सेवा सुरु होत आहे. अर्थात,त्यासाठी खालील नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी पुढीलप्रमाणे हे नियम स्पष्ट केले आहेत :

१. जिल्हा-अंतर्गत सकाळी ७.०० ते संध्याकाळी ७.०० पर्यंत हि बस सेवा सुरु राहील.

२. प्रवासासाठी द्यावयाच्या सर्व बसेस योग्य सॅनिटायझरचा वापर करून निर्जंतुक केलेल्या असतील.

३. सोशल डिस्टंसिंगचा वापर करून बसच्या एकूण क्षमतेच्या केवळ ५० % प्रवाशांनाच प्रवास करण्याची मुभा असेल.

४.जेष्ठ नागरिक व १० वर्षाखालील लहान मुलांना बस प्रवासाची परवानगी असणार नाही. (अत्यावश्यक वैद्यकीय कारण वगळून )

५. प्रत्येक प्रवाशाने व एसटी कर्मचाऱ्याने प्रवास सुरु करताना सॅनिटायझरने आपले हात निर्जंतुक करणे गरजेचे आहे.

६. प्रवासामध्ये प्रत्येक प्रवाशाने व एसटी कर्मचाऱ्याने तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे.

वरील अटी व शर्तींचे काटेकोरपणे पालन करून सर्वसामान्य प्रवाशांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसटी महामंडळास सहकार्य करावे, असे आवाहन मंअनिल परब यांनी केले आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज ४,८७८ कोरोना रुग्णांची नोंद, तर २४५ जणांचा मृत्यू

News Desk

परळी वैजनाथ येथील महाशिवरात्र यात्रा उत्सव रद्द करीत असल्याचे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांचे आदेश…

News Desk

“काही समाज विघातक व्यक्तींनी माझ्या सूचनेचा विपर्यास करुन धार्मिक तेढ निर्माण केली”

News Desk