HW News Marathi
Covid-19

२ दिवसात खत दरवाढ मागे घ्या, नाहीतर राज्यभर घंटानाद आंदोलन करणार !

मुंबई | महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खत दरवाढीवरून थेट पंतप्रधान मोदी यांच्यावर घणाघात केला आहे. “येत्या २ दिवसांत ही अन्यायकारक खत दरवाढ मागे घ्यावी अन्यथा काँग्रेस राज्यभर घंटानाद आंदोलन करेल”, असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे. “शेतक-यांचे मरण हेच मोदी सरकारचे धोरण असून शेतकरी विरोधी तीन काळे कायदे आणल्यानंतर आता रासायनिक खतांच्या किंमती वाढवून शेतक-यांना उद्धवस्त करण्याच्या मोहिमेला मोदींनी वेग दिला आहे. दिडपटीने वाढलेल्या खतांच्या किंमतीमुळे शेतक-यांना शेती करणे परवडणार नाही व मोठ्या उद्योगपतींना शेती कंत्राटीपद्धतीने देण्याशिवाय त्याच्यापुढे पर्याय राहू नये म्हणूनच ही दरवाढ केली आहे. येत्या २ दिवसात ही अन्यायकारक खत दरवाढ मागे घ्यावी अन्यथा काँग्रेस राज्यभर घंटानाद आंदोलन करेल” असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.

नाना पटोले म्हणाले की, “कोरोनाच्या संकटाने शेतकरी पुरता पिचला गेला आहे. त्याला आधार देण्याऐवजी खतांच्या किंमती भरमसाठ वाढवून त्यांच्यावर आणखी अन्याय केला आहे. तीन काळे कृषी कायदे आणून मोदी सरकारने शेतक-यांना बड्या उद्योगपतींचे गुलाम बनविण्याचा विडा उचलला आहे. रासायनिक खतांच्या किंमतीत केलेली दीडपट वाढ हे त्या दृष्टीनेच टाकलेले पाऊल आहे. दीडपट हमीभाव देण्याची घोषणा करणा-या मोदींनी हमीभावाऐवजी शेतक-यांना येणारा उत्पादन खर्च दीडपट वाढवला आहे. पेट्रोल-डिझेल, खाद्यतेलांच्या दरवाढीमुळे अगोदरच जनतेचे कंबरडे मोडले असताना रासायनिक खतांच्या दरवाढीचा बोजा शेतक-यांवर टाकला आहे. एका बाजूला शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये जमा केल्याचा गाजावाजा करून दुस-या बाजूला खतांच्या किंमती वाढवून प्रत्यक्षात शेतक-यांची लूट करत उद्योगपती मित्रांची घरे भरण्याचे काम मोदी करत आहेत”, असा घणाघात नाना पटोलेंनी केला आहे.

लोकसभा निवडणूक घेण्याच्या चंद्रकांत पाटलांच्या मागणीला पाठिंबा

लोकसभा निवडणूक घेण्याच्या चंद्रकांत पाटलांच्या मागणीला पाठिंबा असल्याचे सांगत नाना पटोले म्हणाले कि, “चंद्रकांत पाटीलच लोकसभा निवडणूक घेण्याची मागणी करत आहेत याचाच अर्थ मोदी अपयशी ठरले आहेत हे आता भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कळून चुकले आहे. मोदींचा राजीनामा घेऊन गडकरींना पंतप्रधान करावे अशी मागणी भाजपाचेच काही नेते करत आहेत. चंद्रकांत पाटलांच्या मागणीला आमचा पाठिंबा असून त्यांनी मोदींना राजीनामा द्यायला सांगून निवडणुका घ्यायला सांगाव्यात. म्हणजे देशातील जनतेच्या मनात काय आहे आणि कोणाच्या किती जागा येतील ते ही कळेल”, असा टोला नाना पटोलेंनी लगावला आहे.

उद्या कोकणता जाऊन चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार

तौक्ती चक्रीवादळाचा महाराष्ट्राला बसलेल्या फटक्याबाबत बोलताना नाना पटोले म्हणले कि, “तौक्ती चक्रीवादळाने महाराष्ट्र, गुजरातसह इतर राज्यातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त गुजरातचाच दौरा करून नुकसानीची पाहणी करत आहेत. चक्रीवादळामुळे कोकणात प्रचंड नुकसान झाले आहे त्या भागाचा दौरा पंतप्रधान का करत नाहीत? नरेंद्र मोदी फक्त गुजरातचेच पंतप्रधान आहेत का? असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला. कोकणात चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. घरे, नारळ, आंब्याच्या बागांसह मच्छीमारांच्या बोटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रशासनाकडून झालेल्या नुकसानाची माहिती घेत आहेत. पंचनाम्याचे काम सुरु असून नुकसानग्रस्तांना लवकरच मदत देण्यात येईल. मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख दौरे करून झालेल्या नुकसानाची पाहणी करत आहेत. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार ही नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत आपण स्वतःही उद्या गुरुवारी (२० मे) कोकणाच्या दौ-यावर जाणार असल्याचे नाना पटोले म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मनसे’च्या हर्षवर्धन जाधव यांचा राजकारणातून संन्यास, दिले ‘हे’ कारण

News Desk

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी कोरोना पॉझिटिव्ह

News Desk

कल्याण-डोंबिवलीमध्ये ही लॉक डाऊन १९ जुलैपर्यंत वाढवला!

News Desk