HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यास प्रारंभ

रायगड । महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा आज आज (६ जून) ३४५वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा आहे. या सोहळ्याला उत्साहात ढोल-ताशांच्या गजरात शिवरायांना मानवंदना करून १० वाजता सुवर्ण अभिषेकला सुरुवात झाली आहे. स्वराज्याला शाश्‍वत स्वरूप निर्माण व्हावे, या उद्देशाने ६ जून १६७४ रोजी राजधानी रायगडावर शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला. ‘छत्रपती’ या बिरुदावलीसह ‘शिवशक’ ही कालगणना, होन व शिवराई ही चलणी नाणी यासह आपली स्वतंत्र राजवट चालविली. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे आयोजन केले गेले. या पार्श्वभूमीवर काल (५ जून) सायंकाळी रायगडावर गडपूजन आणि जागर शिवकालीन युद्धकलेचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कोल्हापूर हायर्कसच्या वतीने गडपूजन सोहळ्यासाठी राज्यातील अनेक गडकिल्ल्यांवरून तसेच लेह लडाख येथील स्टोट कांग्रीचे जल आणण्यात आले होते. खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते गडपूजन झाले. त्यानंतर शिवकालीन युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम झाला. राज्यातील युद्धकला आखाड्यांचा यात सहभाग होता. तलवार, भाला, जांबिया, माडू, फरी- गदगा यांचे सादरीकरण झाले. या वेळी इतिहास अभ्यासक राम यादव यांच्या दुर्गराज रायगड परिचित-अपरिचित स्थळांचे छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

या पार्श्वभूमीवर दिवसभर शिवभक्तांनी रायगडावर स्वच्छता मोहीम राबविली. रायगड परिवाराच्या वतीने ३१० शिवसैनिक, तर नामाचे मानकरी (लाटवडे, ता. हातकणंगले) या मोहिमेत सहभागी झाले. सोलापूरच्या विजय क्षीरसागर या चिमुकल्याने पोवाड्याचे गायन केले. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती यांच्यावतीने शिवराज्याभिषेक सोहळा, दुर्गराज रायगड येथे गुरुवारपासून सुरू झाला. यावेळी ‘जागर शिवकालीन युध्दकलेचा’ या मर्दानी खेळाचे सादरीकरण झाले. राज्यभरातून आलेल्या शिवभक्तांनी होळीच्या माळावर आपली युध्दकला या माध्यमातून सादर केली. या वेळी संभाजीराजेंसमवेत पोलंड व चीन येथील प्रतिनीधी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांना मिळणार शिष्यवृत्ती 

swarit

दोन्ही राजे भिडले, गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न

News Desk

‘भाजपवाल्यांचा कोणत्या अभिनेत्रींशी संबंध आहे हे उघड करायला आम्हाला आव्हान देऊ नये’ – मलिक

Manasi Devkar