HW News Marathi
महाराष्ट्र

हरिश्चंद्र गडावर अडकलेल्या ट्रेकर्सची गड उतरण्यास सुरुवात

मुंबई | कल्याणचे २० ट्रेकर्स हरिशचंद्र गडावर ट्रेकींगसाठी गेले असता कोकणकडा येथे हे सर्व ट्रेकर्स अडकले होते. त्यांना वाचविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आता या ट्रेकर्सनी त्यांच्या सोबत असलेल्या व्यावसायिक प्रशिक्षित ट्रेकर्सच्या मदतीने गड उतरण्यास सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे एनडीआरएफची मदत घेण्यात आली आहे. स्थानिक पोलिसही या कामात त्यांना मदत करीत आहे.

कल्याणचे डॉ. हितेश अडवाणी हे २० जणांसोबत हरिशचंद्रगड येथे ट्रेकिंसाठी गेले होते. यामध्ये ५ महिला आणि त्या ठिकाणाहून दिड किलोमीटर पुढे १०० फूट खाली हे सर्व ट्रेकर्स अडकले होते. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कल्याण तहसीलदार आणि पोलीस यांना देखील यासंदर्भात समन्वय ठेऊन ट्रेकर्सची सुटका करण्याबाबत निर्देश दिले होते. ठाण्याहूनही काही ट्रेकर्सची यासाठी मदत घेतली जात आहे. या ट्रेकर्संना काळोख्या गडावर रात्र काढावी लागली.

जिल्हाधिकाऱ्यांनी ठाणे ग्रामीण पोलीस तसेच जुन्नर पोलीस यांना देखील या घटनेविषयी कळविले असून तहसीलदार अमित सानप या मोहिमेवर लक्ष ठेवून होते. अंधार असल्याने त्या ट्रेकर्संना मार्ग शोधण्यात अडचण निर्माण होत होती. त्यामुळे बचाव पथकाला त्यांचे नेमके लोकेशन पाठवण्यास सांगण्यात आले. खोपोली येथील शिवदुर्ग संस्था सुध्दा मदतीसाठी रवाना झाली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ए.सीचा वापर न करता नैसर्गिक हवा घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

swarit

संकटांनी ग्रस्त शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Aprna

मुख्यमंत्री शपथविधी सोहळा शिवाजी पार्कात घेण्याची प्रथा बनवू नका !

News Desk