HW News Marathi
Covid-19

जाणून घ्या… अ‍ॅमझॉन-फ्लिपकार्टवरील वस्तूंची डिलिव्हरी कोणत्या झोनमध्ये होणार

मुंबई | देशात दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर देशात आजपासून (४ मे) ते रविवारी (१७ मे) लॉकडाऊनचाच कालावधी वाढवला आहे. मात्र, देशातील राज्य आणि जिल्यामध्ये रेड झोन, ऑरेंज झोन आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यानुसार आजपासून अ‍ॅमझॉन आणि फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीस परवानगी दिली आहे.

सरकारने निश्चित केल्या झोननुसार ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये अत्यावश्यक वस्तूंचया होम डिलिव्हरीला सुरुवात केली आहे. या दोन्ही झोनमध्ये आजपासून सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत ऑनलाईन विक्री सुरू राहणार आहे. रेड झोनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही वस्तूंची डिलिव्हरी होणार नाही.

सरकारच्या नियमानुसार, दिल्ली, मुंबई, कोलकाता, हैदराबाद, पुणे, बंगळुरु आणि अहमदाबाद सारख्या शहरांचा रेड झोनमध्ये समावेश आहे. यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शहरांमध्ये अत्यावश्यक वस्तूंची डिलीवरी करण्यात येणार नाही.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात पुन्हा ९० हजारांपेक्षा जास्त रुग्ण वाढले

News Desk

‘पुण्यातील इतर दुकानं सुरु, पण मॉल्स का बंद?’, अजित पवारांनी सांगितलं कारण  

News Desk

ठाकरे सरकारचा “ब्रेक द चेन”चा नारा ! आरोग्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण माहिती

News Desk