नागपूर | राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपकडून डच्चू दिला आहे. कामठी विधानसभा मतदारसंघातून बावनकुळे यांच्या जागी भाजपने टेकचंद सावरकर यांना उमेदवारी दिली आहे. कामठी येथून बावनकुळे यांच्या पत्नी ज्योती बावनकुळे यांना उमेदवारी मिळेल, अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र, काल (४ ऑक्टोबर) भाजपने चौथी उमेदवारी जाहीर केली असून यातही बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आली नाही.
कामठी विधानसभेत भाजपने आपल्याला संधी दिली नाही. याबाबत माझी कोणतीही नाराजी नाही. पक्ष श्रेष्ठीने जो निर्णय घेतला तो मान्य आहे अशी प्रतिक्रिया ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ते पुढे म्हणाले, मी विदर्भात पक्षासाठी काम करावे अशी पक्षश्रेष्ठीची इच्छा आहे. त्यामुळे नाराज असण्याचे काहीही कारण नाही. बावनकुळे यांच्यासोबत एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यांना भाजपने घरचा रस्ता दाखविला आहे. भाजपने पहिली उमेदवारी जाहीर केल्यानंतर
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.