HW News Marathi
महाराष्ट्र

आदित्य ठाकरे 10 जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार

मुंबई | राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे १० जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार असून आदित्य ठाकरेंचा हा दौरा राजकीय नाही, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची तयारी पूर्ण झाल्याचे राऊतांनी आज (८ मे) माध्यमांशी बोलताना सांगितले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. यूपीमध्ये राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला स्थानिक प्रतिनिधी विरोध करत आहेत. परंतु, राज ठाकरेंनंतर आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा असला तरी राजकीय दृष्ट्या महत्वाचा मानला जात आहे. 

राऊत म्हणाले, “मला माहिती नाही, कोणी पोस्टर्स लावले? परंतु, मला एवढेच माहिती आहे की, अयोध्येत शिवसेनेच्या स्वागताची सुरुवात झाली असून अयोध्येमध्ये कोण कोण जातात? यांनी काही फरक पडत नाही. प्रभू श्रीराम सर्वांचे दैवत आहेत. राम हे कोणत्या एका धर्मापुरते मर्यादित नाहीत. आणि सर्व जण आशीर्वाद घेण्यासाठी जातात. परंतु, जर कोणी खोट्या आणि राजकीय भावनेने जात असेल किंवा कोणाला तरी कमी लेखण्यासाठी जात असेल तर त्यांना प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद मिळणार नाही,” असा टोला त्यांनी नाव न घेता राज ठाकरेंना लगावाल आहे. 

“असली नकली काय असते, कोणी पोस्टर लावले पाहिले हे मला माहिती नाही. परंतु, सध्या अयोध्येत आदित्य ठाकरे येणार असल्यामुळे त्यांच्या स्वागताची तयारी सुरू झाली आहे. मला एवढेच माहिती आहे की, प्रभू श्रीराम सर्वांचे दैवत आहेत. राम हे कोणत्या एका धर्मापुरते मर्यादित नाहीत. आणि सर्व जण आशीर्वाद घेण्यासाठी जातात. परंतु, जर कोणी खोट्या आणि राजकीय भावनेने जात असेल किंवा कोणाला तरी कमी लेखण्यासाठी जात असेल तर त्यांना प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद मिळणार नाही. याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जावूनआले आता आदित्य ठाकरे १० जून रोजी अयोध्येला जाणार आहेत.”, असे राऊत म्हणाले.  

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

६ हजार ग्रामपंचायतींमध्ये उभारणार स्वयंचलित हवामान केंद्रे! – दादाजी भुसे

Aprna

पीक विमा योजनेवरून विधानसभेत विरोधक आक्रमक

News Desk

काँग्रेस पक्षाचं शिवसेनेत विलगीकरण झालयं का? निरूपमांचा काँग्रेसला सवाल

News Desk