HW News Marathi
महाराष्ट्र

राज्याच्या अर्थसंकल्पात अजित पवारांनी केल्या ‘या’ महत्त्वाच्या घोषणा

मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचे २०२२-२३ चा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर केले आहे. महाविकासआघाडी सरकारचा आज (११ मार्च) तिसरा अर्थसंकल्प आहे. कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास आणि उद्योग या पाच सूत्रांनी झालेली प्रगती म्हणजेच विकास आहे. ही पंचसूत्रीच यंदाच्या अर्थसंकल्पाचा पंचप्राण आहे, अजित पवार अंर्थसंकल्प सादर करताना म्हणाले.  त्यासाठी राज्यात विकासाची पंचसूत्री हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे.

दरम्यान, अर्थसंकल्पात राज्या उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी १,१६० कोटींच्या निधीची तरतूद आणि शालेय शिक्षण विभागासाठी २,३५४ कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. आरोग्य विभागासाठी ११ हजार कोटींच्या निधीची भरीव तरतूद, कर्करोग व्हॅनसाठी करणार ८ कोटींची तरतूद, जलसंपदा विभागासाठी १३,२५२ कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. आज राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी अजित पवार यांनी विधिमंडळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले. 

अर्थसंकल्पात राज्यासाठी केलेल्या ‘या’ घोषणा

  • आरोग्य सेवेसाठी पुढील ३ वर्षात ११ हजार कोटी खर्च करण्याचे सरकारने नियोजन आहे. शासकीय ट्रॉमा केअर युनिट्स स्थापन करण्यासाठी १०० कोटी रुपये आणि आवर्ती खर्चासाठी १८ कोटींचा निधी देण्यात येणार आहे. तसेच टाटा कॅन्सर रिसर्च सेंटरला आयुर्वेदिक संशोधन केंद्रासाठी १० हेक्टर जमीन देण्यात येणार आहे.
  • सैन्यदलाच्या धर्तीवर पोलीस उपचार रुग्णालय स्थापन करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. या गृह विभागासाठी १,८९२ कोटी रूपये प्रस्तावित आहेत.
  • गडचिरोली येथे नवीन विमानतळाचा प्रस्ताव राज्य सरकारने ठेवला आहे. या विमानतळावर राज्यामध्ये विद्युत वाहनांची संख्या वाढवण्याचे प्रस्तावित असून २०२५ पर्यंत ५००० चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे.
  • कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांसाठी पंडिता रमाबाई महिला उद्योजक योजनेची घोषणा केली आहे. या महिलांना स्वयंरोजगरासाठी भांडवल उपलब्ध करून देणार असल्याची माहिती अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडताना म्हटले आहे.
  • मुंबईत कामासाठी येणाऱ्या नागरिकांच्या निवासाची तात्पुरती सोय व्हावी, यासाठी नवी मुंबई येथे महाराष्ट्र भवन उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली असून यासाठी १०० कोटींची तरतूद करण्यात येणार असे अजित पवार यांनी सांगितले आहे. 
  • एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी ४ हजार १०७ कोटींची तरतूद राज्य सरकारने केली आहे. महामंडळाला ३ हजार नव्या पर्यावरणपूरक बसगाड्या घेण्या येणार आहे. बसस्थानकांचा दर्जा सुधारण्यासाठी, त्यांच्या पुनर्बांधणीसाठी अर्थसाहाय्य उपलब्ध करून दिले जाईल. एसटी महामंडळ विभागासाठी ३,००३ कोटींची तरतूद केल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे
  • प्रत्येक जिल्हा रुग्णालयात टेलिमेडिसिन केंद्र उभारणार, नाशिक नागपूर मध्ये वैद्यकीय शिक्षण संस्था उभारणार. तसेच पुणे शहराजवळ ३०० एकर जागेवर इंद्रायणी मेडिसिटी उभारणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे.
  • महिला शेतकऱ्यांसाठी कृषी योजनांमध्ये ५० टक्के राखीव तरतूद केली असून महिला शेतकऱ्यांसाठी कृषी योजनांमध्ये राखीव असलेली ३० टक्केची तरतूद आता वाढवून ५० टक्के केलेली आहे. तसेच हे वर्ष महिला शेतकरी आणि मजूर वर्ष म्हणून साजरे केले जाईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजुभाऊ कोंगे याचा उपोषणाचा इशारा

News Desk

भाजप आमदार राम सातपुते यांच्या लग्न सोहळ्याची चौकशी होणार 

News Desk

निश्चय करुया मुख्यमंत्री उध्दव ठाकरे…!

News Desk