मुंबई | कोरोनाच्या देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे ठप्प पडलेल्या अनेक गोष्टी आता पुन्हा सुरु व्हायला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, आज (२५ जून) राज्याच्या मंत्रिमंडळाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील जिम्स आणि सलून्स आता पुन्हा सुरु करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. सर्व सामान्यांसाठी हा निश्चितच महत्त्वपूर्ण निर्णय मानला जात आहे.
“राज्यात येत्या आठवड्याभरात जिम्स आणि सलून सुरु होतील. लवकरच याबाबत राज्य सरकारकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातील”, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जिम्स आणि सलून सुरु कारण्याबाबतची चर्चा झाली. राज्यात विभागवार असलेली कोरोनास्थिती लक्षात घेऊन सलून पुन्हा सुरु करण्यात येणार आहे.
The state government has decided to re-open gyms and salons in Maharashtra within a week; guidelines will be issued for it. Maharashtra govt has not taken any decision on allowing religious gatherings in the state: Maharashtra Minister Aslam Sheikh pic.twitter.com/3XXc58OAFt
— ANI (@ANI) June 25, 2020
राज्य सरकारने जरी सलून सुरू करण्यास परवानगी दिली असली तरीही त्यासाठी काही अटी-नियम असतील. ज्याचे काटेकोरपणे पालन करावेच लागेल. या अटींमध्ये केस कपणाऱ्या आणि केस कापून घेणाऱ्या दोघांनीही मास्क घालणे बंधनकारक आहे. तसेच सध्या ही परवानगी केवळ केस कापण्यासाठीच देण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे अद्याप दाढी करण्यास अद्याप परवानगी मिळाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.