HW News Marathi
Covid-19

“गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा”- खासदार संभाजीराजे

सातारा | मराठा आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाच्यावतीने नांदेड येथे संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी मूक आंदोलन झाले. त्यावेळी हजारोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते. आपल्या भाषणातून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष खासदार संभाजीराजेंनी मराठा समाजाचे नेते अशोक चव्हाण यांच्या भुमिकेवर टीका केली. तसेच सरकारने तातडीने पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

आयोजकांपैकी सुमारे २१ जणांवर गुन्हा

राजकीय पक्षांना वेगळा न्याय आणि मराठा समाजाला वेगळा न्याय, असे का ? असा संतप्त सवाल खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित केला आहे. नांदेड येथील मराठा आरक्षणासाठीच्या मूक आंदोलनानंतर आयोजकांपैकी सुमारे २१ जणांवर पोलिसांनी कोविड मार्गदर्शकतत्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यावरुन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी समाजमाध्यमातून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान या आंदोलनानंतर पोलिसांनी कोविड १९ च्या नियमांचा भंग म्हणून सुमारे २१ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सामान्य गरीब मराठा बांधवांवार गुन्हा दाखल झाल्याची भावना खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त करुन सरकारला काही प्रश्न केले आहेत. त्यांचा राग त्यांनी समाज माध्यमातून व्यक्त केला आहे.

खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणालेत गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा!समाजाच्या गरीब मराठा बांधवांच्यावर का? समाजाच्या प्रश्नांसाठी नांदेड येथे एकत्र आलेल्या मराठा बांधवांवर प्रशासनाने काेविडचे कारण दाखवत गुन्हे दाखल केले आहेत. राजकीय पक्षांना वेगळा न्याय आणि मराठा समाजाला वेगळा न्याय, असे का? असा संतप्त प्रश्न संभाजीराजेंनी उपस्थित केला आहे.

जिल्हाधिकारी नांदेड यांनी १४४ कलम अन्वये संचारबंदी लागू असताना तसेच आंदोलनाची कुठलीही पुर्वपरवानगी न घेता सदर आंदोलन करुन सामाजिक अंतराचे पालन न करता कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढेल अशी घातक कृती करुन आंदोलन केले. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले असे पोलिस अधिका-याने दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

त्या कुटुंबाच्या निष्काळजीपणामुळे इस्लामपुरला कोरोनाचा धोका,गुन्हा दाखल करण्याची शिवसेनेचा मागणी !

Arati More

अमित शाह श्वसनाच्या त्रासामुळे पुन्हा ‘एम्स’मध्ये दाखल 

News Desk

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन,  उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

News Desk