HW News Marathi
महाराष्ट्र

भुयारी गटार योजनेस राज्य शासनाची मंजूरी

सांगली | महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पाटील यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात पहायला मिळत आहे. तासगांव शहरामधून मुख्य तीन नाले वाहतात. त्यामुळे शहरात दुर्गंधीचे प्रमाण वाढत आहे. शहराच्या मुख्य वस्तीमधून वाहणा-या नाल्यांवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी सांगली जिल्हयाचे खासदार व महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनातून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान राज्यस्तर योजनेतंर्गत रु. ७०.३६ कोटी रक्कमेंंच्या तासगांव शहर भुयारी गटर योजनेस मंत्रालय मुंबई येथे आयोजित केलेल्या बैठकीमध्ये मंजूरी देणेत आली आहे. सदर बैठकीला संजय पाटील स्वतः उपस्थित होते. त्यांचे समवेत तासगांव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष डॉ. विजय भिकू सावंत तसेच मुख्याधिकारी गणेश शिंदे हे ही उपस्थित होते.

सदर योजना रु. ७०.३६ कोटीची असून, यात शहरात विविध भागात ९२.४२ कि.मि.ची भुयारी गटर समाविष्ट आहे. शहरातील सर्व सांडपाणी भुयारी गटरव्दारे कापूर नाल्यामधून साठेनगर लगत एकत्र करण्यात येणार असून, या ठिकाणी मलशुध्दीकरण केंद्र उभारणेत येणार आहे. या मलशुध्दीकरण केंद्रामध्ये सर्व सांडपाणी शुध्द करुन त्याचा पुन्हा वापर शेतीसाठी करण्यात येणार आहे. यामुळे तासगांव शहरातील मलःनिस्सारणाचा कायमस्वरुपी प्रश्न मिटणार आहे. तासगांव शहर भुयारी गटर योजना राबविण्याचा संजय पाटील यांनी तासगांवच्या जनतेला दिलेला शब्द या निमित्त पुर्ण होत आहे तासगांव नगरपरिषदेच्या इतिहासामध्ये विकास कामास इतका भरीव निधी पहिल्यांदाच प्राप्त होत आहे. त्यामुळे तासगांव शहरात नागरिका समाधान व्यक्त करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकासआघाडी सरकारमध्ये पुन्हा नाराजी, काँग्रेस नेत्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र तर सोनिया गांधींचीही घेणार भेट

Aprna

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा ५०-५० चा फॉर्म्युला

News Desk

महाराष्ट्र राज्य सर्वात आधी हागणदारी मुक्त होईल – मुख्यमंत्री

News Desk